मुंबई : दाक्षिणात्य हॅन्डसम हंक आणि अनेक मुलींच्या मनावर राज्य करणारा सूर्या हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच सुर्याला 'सूरराई पोत्रू' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर चाहत्यांनी सुर्या आणि त्याच्या करिअर विषयी सर्च केलं. तर सुर्या त्याला एक अभिनेता म्हणून मिळालेल्या यशाचं संपूर्ण श्रेय हे त्याची पत्नी ज्योतिकाला देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्या दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहितीये सूर्याची पत्नी ज्योतिका कोण आहे? सूर्याची पत्नी ज्योतिका ही एक अभिनेत्री आहे. पती सूर्या प्रमाणेच ज्योतिका ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. 



अभिनयाच्या बाबतीत ज्योतिका ही सूर्यापेक्षा कमी नाही. ज्योतिका देखील राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे. 'सूरराय पोत्रू' या चित्रपटासाठी सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तर याच चित्रपटाच्या निर्मितीसाठी ज्योतिकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 


या दोघांची लव्ह स्टोरी ही त्याच्या Profession प्रमाणे फिल्मी आहे. चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली. 1997 साली प्रदर्शित झालेल्या 'नेरुक्कू नेर' या चित्रपटातून सूर्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला. १९९९ साली सूर्या आणि ज्योतिकाची भेट झाली. त्या दोघांची भेट ही 'पूवेल्लम केट्टुपर' या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा ते भेटले. ज्योतिका ही मुंबईतील पंजाबी कुटुंबातील असून सूर्या हा तामिळ आहे. 


त्यावेळी सूर्या आणि ज्योतिका हे दोघेही स्ट्रगलिंग अॅक्टर होते. ते दोघेही स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्योतिकाला खरंतर तमिळ भाषा येत नव्हती आणि तामिळ चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. ज्योतिकाचं तिच्या कामाप्रती असलेलं समर्पण पाहून सूर्याला आश्चर्य वाटलं. सूर्याला ज्योतिकाचा शांत स्वभाव आवडला. 


त्यानंतर ज्योतिका आणि सूर्याची २००१ मध्ये भेट झाली. यानंतर त्यांच्यात बोलणं सुरु झालं. मग चांगले मित्र झाले आणि त्यानंतर सूर्याने त्याच्या जवळच्या मित्रांशी ज्योतिकाची ओळख करून दिली. नंतर ते दोघं बऱ्याचवेळा 
एकत्र दिसले. 'काखा काखा' या चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली आणि मग ते दोघं 11 सप्टेंबर 2006 रोजी लग्न बंधनात अडकले. त्या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सूर्या आणि ज्योतिका यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत. लग्नाला इतक्या वर्षानंतरही दोघांचे प्रेम अजिबात कमी झालेले नाही. 


दोघांनी 7 चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली. यामध्ये 'पूवेल्लम केतुप्पर', 'उइरिले कलंथाथु', 'काखा काखा', 'पेराझगन', 'मायावी', 'जून आर' आणि 'सिल्लुनू ओरु काधल' यांचा समावेश आहे.