Viral Meme: सोशल मीडियावरून अनेकांना एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळालं आहे. येथे आलेले अनेक सोशल मीडिया इन्फुएन्सर्स हे एका रात्रीत स्टार झाले आहेत. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांना वेड लावलं आहे. So Beautiful, so Elegant, Just looking like a wow, Just looking like a wow! हे शब्द तुम्ही सध्या इन्स्टाग्रामवरून सतत ऐकत असालच. इन्स्टाग्रामवरून ऑनलाईन होलसेलिंग कपडे विकणाऱ्या एका विक्रेतीच्या साड्या, ड्रेसेस विकण्याच्या स्टाईलवरनं सध्या सोशल मीडियावर तूफान मीम्स व्हायरल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सध्या हिची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. इन्स्टाग्रामवर जसमीत कौर आपल्या मैत्रीणीसोबत ड्रेसेस, साड्या, कुर्ता, पंजाबी सूट्स विकतात. आपले हे व्हिडीओज जसमीत आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी So Beautiful, So Elegant, Just looking like a wow, Just looking like a wow! असं म्हणतात आणि फक्त हेच त्याचं वाक्य इतकं व्हायरल झालं की त्यांच्यावरून अनेक सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर्स हे मीम्स तयार करू लागले. 


काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण हिनं हे मीम तयार केले होते. त्यानंतर तिच्या या मीमवरून याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली की हे मीम नक्की आहे तरी काय? लोकांना आधी वाटलं की हे दीपिकीचाचं काहीतरी प्रमोशन आहे परंतु तसं काही नाहीये. जसमीत कौर यांची ही विकण्याची पद्धत, स्टाईल ही इतकी लोकप्रिय झाली की त्यांच्या या चार वाक्यांवरून सर्वत्र मीम्स व्हायरल होयला लागले आहेत. संगीतकार, गायक यशराज मुखाटे यानंही देखील यावर एक गाणं तयार केलं आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र जोरात चर्चा रंगली होती. त्यानंतर आपली पत्नी अथिया शेट्टी हिच्या एका फोटोवरही क्रिकेटर के.एल.राहूलनंही अशीच कमेंट केली आहे. त्यानंतर असे अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ज्यांनीही यावरून भन्नाट मीम्स तयार केले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जसमीत कौर यांच्या या Just Looking Like a WOW... ट्रेण्डमुळे त्यांच्या ऑनलाईन बिझनेसलाही याचा फायदा झालेला मिळतो आहे. त्याच्या लोकप्रियतेतही सध्या चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वत्र आता इन्स्टाग्रामवरती फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा आहे. सध्या तरूणाईही सेलिब्रेटींप्रमाणे या मीमवर थिरकताना दिसते आहे. यावेळी त्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. गाणी तर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. तेव्हा आता या डायलॉग मीमनंही सगळीकडे आनंद पसरवला आहे. अल्पवधीतच हे मीम लाखो लोकांपर्यंत पोहचलं आहे.