Guess Who: कोण आहे `ही` Cute मुलगी? जिच्या प्रेमात आहे अख्खं साऊथ... जाणून घ्या
सध्या अशाच एका साउथच्या (South Industry) प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भल्याभल्यांना त्या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे.
South Actress Childhood Photos: आपण नेहमीच 'बॉलीवूड' (Bollywood Celebs)कलाकारांना कोणत्या नं कोणत्या कारणांसाठी चर्चेत पाहिले असेल. 'फिल्मस', 'लेट नाईट पार्टीस', 'राजकरण', 'अफेअर्स', 'रिलेशनशिप', किंवा त्यांची 'लग्जरी लाइफस्टाईल' असो ते नेहमीच चर्चेत असतात. तसेच टॉलीवूड इडंस्ट्रीतील (Tollywood Industry) कलाकारही अशाच कारणांमुळे चर्चेत येतात. सध्या 'टॉलीवूड इडंस्ट्री' मधील कलाकार बॉलीवूड चित्रपटांत (Movie) हजेरी लावताना दिसत आहे. या कलाकारांचे चाहते (Fans) त्यांच्या प्रत्येक बातम्या आवडीने वेळ काढून वाचतात आणि ऐकतात. बरं हे स्टार्स (stars) त्यांच्या बालपणाच्या फोटोजमुळे सोशल मीडिया वर देखील चर्चेत असतात.
सध्या अशाच एका साउथच्या (South Industry) प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भल्याभल्यांना त्या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे.
आईच्या कुशीत बसलेली मुलगी कोण?
ज्या फोटोविषयी बोलत आहोत त्या फोटोत एक लहान मुलगी तिच्या आईच्या कुशीत बसलेली आहे. तिचे बाबा आणि भाऊ तिच्या बाजूला उभे राहुन पोज देत आहेत. तो फोटो पाहुन जर तुम्हाला त्या साउथच्या (South Industry) प्रसिद्ध एक्ट्रेसला ओळखणे जर कठीण जात असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ती अभिनेत्री आहे 'बाहुबली'मध्ये 'देवसेना' हे पात्र साकारणारी 'अनुष्का शेट्टी' (Anushka Shetty).
'अनुष्का शेट्टी' (Anushka Shetty) साउथच्या प्रसिद्ध एक्ट्रेसपैकी एक आहे. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये आयकॉनिक भुमिका साकारली, पण बाहुबलीमधील (Bahubali) देवसेनाची (Devsena )भुमिका साकारल्यानतंर तिला जागतिक स्तरावरही (Global) ओळख मिळाली. बाहुबली चित्रपटात 'प्रभास' (Prabhas) आणि 'अनुष्काची' (Anushka Shetty) ऑनस्क्रिन कॅमेस्ट्रीला चाहत्यांनी (Fans) खुप पसंती दर्शवली म्हणुन त्यांना रिअल लाईफमध्येही त्यांचं नातं जोडलं जातं. परंतू दोघांनी नेहमीच एकमेकांना मित्र-मैत्रिण आहेत असंच सांगत या सर्व अफवा धुडकावून लावल्या आहेत.
अनुष्का सोशल मीडियावर अॅक्टीव
अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव असते. सोशल मीडियावर 5.6 मिलियन यूजर्स तिला फॉलो करतात. कमर्शियल पोस्ट व्यतीरिक्त अनुष्का शेट्टी आपल्या परिवारासोबतचे फोटो (Family Photos) देखील तिच्या इंस्टाग्रामला (Instagram) अकांऊट पोस्ट करते.