मुंबई : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी करियरची सुरूवात करताचं चाहत्यांच्या मनात राज्य केलं. मिथुन दायांनी डान्स आणि अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनाचा ताबा मिळवला. आज देखील त्यांच्या चाहत्यांची फार मोठी आहे. चाहत्यांचे सुपरहिरो असणारे मिथुन खऱ्या आयुष्यात देखील कुटुंबाचे सुपरहिरो आहेत. त्यांना चार मुलं आहेत. तीन मुलं महाक्षय, नमाशी, उश्मे आणि दिशानी चक्रवर्ती नावाची त्यांनी सुंदर मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा महाक्षय सर्वांच्या ओळखीचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पण त्यांची दत्तक मुलगी सध्या तुफान चर्चेत आली आहे. मिथुन यांच्या दोन मुलांनी कलाविश्वात पाय ठेवला आहे. पण त्यांची मुलगी दिशानी सध्या झगमगत्या जगापासून दूर आहे. पण दिशानी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.  दिशाचा अंदाज देखील  नेटकऱ्यांना फार आवडतो. दिशानी सध्या कॅलिफॉर्नियामध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. 



अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी दिशानी परदेशात आहे. दरम्यान दिशानीचे एका मुलासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दिशानीसोबत असणारा हा मिस्ट्रूीमॅन कोण आहे? असा प्रश्न सध्या सर्वांना सतावत आहे. फोटोंमध्ये दोघे फार क्लोज दिसत आहेत. दिशानीसोबत असलेल्या मिस्ट्रीमॅनचं नाव  Cody Sulek असं असून तो एक परदेशी अभिनेता आहे. 


त्याने आतापर्यंत  'सँटा बूट कँप', 'योर प्रिटी फेस इज गोइंग टू हेल' यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिशानी चक्रवर्ती (Dishani Chakraborty) आणि Cody Sulek दोघे ऐकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात. दिशानी Cody Sulek च्या कुटुंबाला देखील भेटली  आहे. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.