कोण आहे `वसूली भाई`ची पत्नी? चित्रपटसृष्टीपासून दूर कॉर्पोरेटमधये जॉब करतो मुलगा
Who is Vasooli Bhai`s Wife : गोलमालमधील वसूली भाईची पत्नी कोण आणि काय करते माहितीये? तर मुलगा करतो कॉर्पोरेटमध्ये नोकरी
Who is Vasooli Bhai's Wife : 'गोलमाल' या चित्रपटात वसूली भाईची भूमिका साकारत सगळ्यांच्या मनात स्वत: चं एक स्थान निर्माण केलं. मुकेश तिवारीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. मुकेशनं सगळ्यात जास्त खनलायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण 'गोलमाल' फ्रेंचायझीमुळे त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. दरम्यान, आज आपण वसुली भाई अर्थात मुकेश तिवारीची पत्नी कोण आणि त्याचा मुलगा काय करतो याविषयी जाणून घेणार आहोत.
1994 मध्ये मुकेशनं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण पूर्ण केलं. मुकेश तिवारीचे यावेळी कोण कोण बॅचमेट होते याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यात आशुतोष राणा, कुमुद कुमार मिश्रा आणि यशपाल शर्मा हे कलाकार होते. तर इथेच शिकत असलेल्या एका मुलीच्या तो प्रेमात पडला आणि एमएसडी पास झाल्यानंतर लगेच मुकेशनं गर्लफ्रेंड वायलट नाजीरशी लग्न केलं. दोघांनी 20 जून 1995 मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 34 वर्ष झाली आहेत. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे मुकेश आणि वायलट कधीच एकत्र कुठे दिसले नाही. मुकेश सोशल मीडियावर देखील पत्नी आणि मुलाचे फोटो शेअर करत नाहीत.
वायलट नाजीर ही स्वत: अभिनेत्री आहे. तिनं चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नवभारत टाइम्स नुसार, वायलट आता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या रिपेरेट्री कम्पनीमध्ये काम करते. मुकेश आणि वायलट यांचा मुलगा इंडस्ट्रीपासून दूर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत आहेत. वायलट सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिनं 2022 मध्ये मुकेशसोबतच्या एनएसडीच्या दिवसातील काही फोटो शेअर केले होते. दोन वर्षांपूर्वी मुलासोबत देखील काही फोटो शेअर केले होते. ज्यात त्यानं शेरवानी आणि पगडी घातली होती. मुकेश तिवारी आणि वायलट नाजीर हे त्यांच्या नात्याला प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न करतात असं त्यांना म्हटलं जातं. वायलट अभिनेत्री असली तरी सुद्धा ती लाइमलाइटपासून दूर आहे.
हेही वाचा : 'स्वत: चं वय पाहत नाही अन् मला...'; पन्नाशीत हिरोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर भडकली सोनाक्षी
मुकेश तिवारीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तमिळ, तेलगू, पंजाबी आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये त्यानं खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदीसोबत दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मुकेश तिवारीनं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चाइना गेट' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मुकेशनं या चित्रपटात जगीरा ही भूमिका साकारली आणि याच चित्रपटात प्रेक्षकांमध्ये छाप सोडली.