'स्वत: चं वय पाहत नाही अन् मला...'; पन्नाशीत हिरोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर भडकली सोनाक्षी

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हानं एका मुलाखतीत अभिनेत्रींनाच सतत स्ट्रगल करावं का लागतं यावर वक्तव्य केलं होतं. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 18, 2024, 01:38 PM IST
'स्वत: चं वय पाहत नाही अन् मला...'; पन्नाशीत हिरोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर भडकली सोनाक्षी title=
(Photo Credit : Social Media)

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या जुन्या ‘रामायण’ च्या प्रश्नावरून चर्चेत आहे. यावर 5 वर्षांनंतर अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सोनाक्षी सिन्हानं हजेरी लावली होती. त्यावेळी ती ‘रामायणावर असलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नव्हती त्यावरून मुकेश खन्ना यांनी तिला ट्रोल केलं. यामुळे चर्चेत असणारी सोनाक्षी आता एका तिच्या दुसऱ्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत सोनाक्षीनं इंडस्ट्री स्टॅंडर्ड्सवर वक्तव्य केलं. तिनं सांगितलं की कशा प्रकारे वयापेक्षा जास्त मोठं दिसल्यानं अभिनेत्यानं तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. 

सोनाक्षीनं याविषयी सांगितलं होतं की 'तिला आनंद आहे की अशी विचारसरणी असलेल्या अभिनेत्यांसोबत तिनं काम केलं नाही याचा तिला आनंद आहे. तिला अशा लोकांसोबत काम करण्याची इच्छा देखील नाही. इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर असलेल्या दडपणाविषयी बोलताना सोनाक्षीनं सांगितलं होतं की हे स्पष्ट आहे की जशी आशा आमच्याकडून करण्यात येते. तशी अपेक्षा अभिनेत्याकडून करता येत नाही.' 

सोनाक्षी अभिनेत्यांविषयी बोलताना म्हणाली 'जर ते वयानं 30 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करु शकतात. विरळ केस आणि पोट सुटलं असेल तरी त्यांच्यावर टीका करण्यात येत नाही. महिलांवरच आक्षेप घेण्यात येतो. मी माझ्या वयापेक्षा मोठी दिसते असं म्हणणाऱ्या अनेक अभिनेत्यांसोबत डील केलं आहे. अशा लोकांचे मला आभार व्यक्त करायचे आहे. मला अशा लोकांसोबत स्क्रीन शेअर करायची नाही. कायम महिलांनी पुढे जाण्यासाठी स्ट्रगल करायला हवं का? त्याच नेहमी अडथळ्यांवर मात देत स्वत: चं स्थान निर्माण करतात.'

पुढे सोनाक्षी म्हणाली, 'आम्ही सगळे आर्टिस्ट आहोत. फक्त महिलांसाठीच इतक्या अडचणी असायला नको. दरम्यान, सोनाक्षीला हा मुद्दा पटत नाही असं सांगत ती म्हणाली की कशा प्रकारे अभिनेते हे वयानं लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत काम करतात.' 

हेही वाचा : 52 व्या वर्षी देखील करण जोहर सिंगल का? ज्युरासिक पार्कशी तुलना करत दिग्दर्शक म्हणाला...

दरम्यान, सध्या पन्नाशीत शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि हृतिक रोशन हे कलाकार आहेत. पण सोनाक्षी सिन्हानं बोलताना कोणत्याही कलाकाराचं नाव घेतलं नाही. तर वरच्यापैकी अनेक अभिनेत्यांसोबत तिनं काम केलं आहे. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर ती हीरामंडी या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिचा आगामी प्रोजेक्ट हा' निकिता रॉय अ‍ॅन्ड द बूक ऑफ डार्कनेस' आहे.