मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) जेव्हापण मुलगी आराध्यासोबत (Aaradhya Bachahan) स्पॉट झाली तेव्हा एक वेगळेपण दिसून आलंय. अनेकदा ती या गोष्टीमुळे ट्रोल्स देखील झाली आहे. (Why Aishwarya Rai Bachchan hold her daughter Aaradhya Bachchan hand every where) ऐश्वर्या राय आपल्या मुलीला आराध्याला कधीच एकटं सोडत नाही. ती कायमच तिचा हात धरून अनेक कार्यक्रमात स्पॉट झाली आहे. मग ते रेड कार्पेट असो, इव्हेंट असो वा एअरपोर्ट असो त्या दोघी एकमेकींचा हात धरूनच दिसल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा तिच्या या गोष्टीवरून मस्करी देखील उडवली गेली आहे. मात्र ऐश्वर्याने कायमच आपण चांगले पालक असल्याचं सिद्ध केलं आहे. ऐश्वर्याला आराध्यासोबत एक चांगल नात निर्माण करण्यासाठी ही गोष्ट कायमच मदत करणार आहे. मुलांच्या संगोपनात आईचा खूप मोठा वाटा आहे. मुलं जेव्हा चालायला-बोलायला शिकतं तेव्हा ते पालकांवर पूर्णपणे अवलंबून असते. आपल्याला माहितच आहे ऐश्वर्या राय लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती जेव्हा पण कुठे जाते तेव्हा खूप गर्दी जमा होते. तेव्हा आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी ऐश्वर्या आराध्याच्या हात पकडून राहते. 



गर्दीत आपण सोबत असल्याची भावना 


अनेकदा अनोळख्या ठिकाणी मुलं घाबरतात किंवा गर्दीतील लोकांना बघून मुलं लाचतात. अशावेळी आपण पालक म्हणून त्यांच्यासोबत आहोत ही भावना मुलांना देण्यासाठी ऐश्वर्या कायमच आराध्याचा हात आपल्या हातात धरून राहते. 


आराध्या एकदा गोंधळली होती 



असं देखील म्हटलं जातं की, एका रेड कार्पेट सोहळ्यात ऐश्वर्यासोबत आराध्या देखील गेली होती. ऐश्वर्याची एन्ट्री होताच गर्दी झाली तेव्हा आराध्या खूप गोंधळली. माणसांची गर्दी, कॅमेऱ्याची लाईट आणि लोकांचा गोंधळ यामुळे आराध्या गोंधळली आणि इकडे तिकडे पळू लागली. याच अनुभवानंतर ऐश्वर्या कायमच आराध्याचा हात धरून असते. 


सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल 


सोशल मीडियावर या कारणाने अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकला देखील ट्रोल करण्यात आलं. मात्र या दोघांनीही याकडे ठरवून दुर्लक्ष केलं. या दोघांना आपल्या मुलीची सुरक्षितता सर्वात महत्वाची वाटते.