पहाटेच्यावेळी वांद्रेच्या त्या जुन्या बिल्डिंगमध्ये का जातो अक्षय कुमार? अनेक वर्षांनंतर केला खुलासा...
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पहाटेच्यावेळी वांद्रेतील त्या बिल्डिंगमध्ये का जातो याचा खुलासा केला आहे.
Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षयचा चित्रपट पाहण्यासाठी आज लाखो चाहते आतुर असले तरी त्यानं देखील त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्याविषयी अक्षयनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं सांगितलं की आयुष्यात तो आज यशस्वी झाला असला तरी देखील जमिनीशी जोडून राहण्यासाठी तो काय करतो.
रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अक्षयनं खुलासा केला आहे. अक्षयनं सांगितलं की तो प्रत्येक महिन्याला त्याच्या जुन्या घरी आणि शाळेत जातो. त्यासोबत त्यानं त्याच्या खासगी आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अक्षय यावेळी म्हणाला की 'खूप आधी माझ्याकडे वांद्रे पूर्वमध्ये एक घर होतं. मी तिथे जातो. मी माझ्या शाळेत जातो. तिथे एक डॉन बॉस्को चर्च देखील आहे. मी कधी-कधी तिथे आत जातो आणि तिथले वॉचमेन मला आत जाण्याची परवानगी देतात. जेव्हा मी माझ्या जुन्या घरी जातो तेव्हा मला खूप चांगलं वाटतं.'
अक्षयनं पुढे सांगितलं की त्या घरातून असलेल्या आठवणी तशाच ठेवण्यासाठी त्यानं ते घर देखील खरेदी केलं. तो त्याच्या आई-वडिलांसोबत ज्या घरात भाड्यानं राहत होता. त्याला ती बिल्डिट तुटणार असल्याची माहिती मिळाली. तर अक्षयला कोणी सांगितलं की "तिथे 2BHK फ्लॅट बनणार आहे. तर मी त्यांना सांगितलं की मला ते खरेदी करायचं आहे. मी तिथे राहणार नाही पण मी त्याला ठेवणार. मला आजही आठवण आहे की जेव्हा माझे वडील त्यांच्या 9-6 च्या नोकरीवरून घरी यायचे आणि माझी बहीण त्यांना घराच्या खिडकीतून घरी येताना पाहायची. तो सीन आजही तिथे आहे.
हेही वाचा : 'देवदास' च्या सेटवर मद्यपान करायचा शाहरुख खान, अभिनेता टीकू तलसानियानं कारण सांगत केला खुलासा
अक्षयनं पुढे सांगितलं की "मी आजही जेव्हा सकाळी 4 वाजता उठतो. तेव्हा मी माझी गाडी घेऊन निघतो आणि त्या घराच्या आवारात म्हणजे सायन-कोळीवाडामध्ये रहायचो तिथे जातो. त्या घरात आम्ही भाड्यावर राहायचो आणि 500 रुपये भाडं द्यायचो. मला आता कळलं की ती बिल्डिंग तुटणार असून नवीन बांधणार आहेत. तर मी त्यांना सांगितलं आहे की मला तिसरा माळा खरेदी करायचा आहे. कारण आम्ही तिसऱ्या माळ्यावर राहायचो. तिथे राहणार नाही, काही करायचं नाही, फक्त घेऊन ठेवायचा आहे."