मुंबई : खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांची अराजकीय मुलाखत चांगलीच चर्चेत होती. नेहमीच देशाचे हित जपणाऱ्या अक्षयने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांला चांगलेच ट्रोल केले आहे. सध्या अक्षयचा एक व्हिडीओ भलताच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुझ्या चाहत्यांचा वर्ग फार मोठा आहे, तरी तुझ्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून तूझ्यावर टीका केली जाते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मतदान का नाही असा प्रश्न विचारताच त्याने पत्रकाराला गप्प केले आणि त्यांना बाजूला करत 'चलिए, चलिए' असे उद्गार काढले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोर धरत आहे. 


अक्षयने 'केसरी', 'पॅडमॅन', 'टॉयलेट - एक प्रेम कथा', 'एअरलिफ्ट' आशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपले देश प्रेम व्यक्त केले आहे. त्यामुळे चाहते काही प्रमाणात अक्षयवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्याच्या अशा वागण्यानंतर नेटकऱ्यांच्या त्याच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत. 


मुंबईमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या लोकशाहीच्या उत्सवात अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे कहींकडे भरताचे नागरिकत्व नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अक्षय कुमारकडे कॅनडाचा परवाना असल्यामुळे त्याला मतदान करता आले नसल्याचे समोर आले आहे.