मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) 'चला हवा येऊ द्या'  (Chala Hawa Yeu Dya)या कार्यक्रमातून अभिनेता भाऊ कदम हे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले आहेत. डोंबिवलीत राहणाऱ्या भाऊ कदमचा (Bhau Kadam)  चाहता वर्ग हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही आहे. भाऊ कदम हे दिग्गज अभिनेते, विनोदी कलाकार असले तरीही ते खूप विनम्र आहेत. भाऊ कदम यांनी स्वतः एका व्हिडिओत ते एवढे विनम्र कसे? (Why Bhau Kadam so Down to Earth?)  या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊ कदम यांनी इंस्टाग्रामला आपला जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भाऊ कदम एक किस्सा सांगत आहेत. या किस्स्यातून त्यांनी आपलं घरची सत्य परिस्थिती आणि ते एवढे विनम्र कसे? याचं उत्तर दिलं आहे. 



'समजा मी एखादी ट्रॉफी घेऊन घरी आलो. तर मला वाटतं की, माझ्या हातातली ट्रॉफी बघून माझी बायको खूष होईल. पण तसं होत नाही. ती (बायको) माझ्या हातातून ट्रॉफी घेते. आणि सांगते खाली जाऊन दूध घेऊन या. आता सांगा का मी हवेत उडू. मी याचसाठी डाऊन टू अर्थ आहे.', भाऊ कदम यांनी सांगितला हा किस्सा. 


भाऊ कदमचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. भाऊ कदमच्या या कार्यक्रमात त्यांची मुलगी आणि अनेकांनी सांगितलं होतं की, भाऊ कदम खूप नम्र आहेत. ते अजिबातच कोणत्याही गोष्टीचा मोठेपणा मारत नाही. त्यावेळी भाऊ कदम यांनी हा किस्सा सांगितला आहे.