Amitabh Bachchan Rekha :  बॉलिवूडची चंदेरी सफर म्हटली तर सुपरस्टार अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बींशिवाय अपूर्णच म्हणावी लागेल. बॉलिवूडच्या या शेहनशाहाने जसं त्याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही ते कायमच चर्चेत असतात. 1981 प्रदर्शित झालेला सिलसिला या सिनेमातील अमिताभ आणि रेखाची जोडी मोठ्या पडद्यावर जशी गाजली तशीच खऱ्या आयुष्यातही यांच्या अपूर्ण प्रेमकहाणीचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये आजही प्रसिद्ध आहेत. प्रसिद्धी आणि त्यासोबतच आलेल्या खऱ्या खोट्या बातम्या यातून प्रत्येक कलाकार कधी ना कधी गेलेला असतोच, मात्र बी बिग आणि रेखा यांच्या केमिस्ट्रीला आज इतकं दशकं उलटूनही ही जोडी चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. मीडिया रिपोर्ट पाहिला तर बिग बी, रेखा आणि जया बच्चन यांच्याबद्दल अनेक किस्से वाचायला मिळतात. आजही कोणतीही पार्टी असो किंवा पुरस्कार सोहळा रेखा आणि अमिताभ अगदी जया बच्चन यांच्यावर कॅमेऱ्याची नजर असते. (Why did Rekha lock herself bathroom on Amitabh Bachchan 60th birthday Throwback entertainment news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखाने दिलेली अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली आणि त्यावर बिग बींचं मौन या सगळ्या गोष्टींवर अनेकदा मीडिया रिपोर्ट समोर आलेत. असं म्हटलं जातं की, 11 ऑक्टोबर 2023 जेव्हा बिग बी यांच्या 60 व्या वाढदिवशी रेखाने खास करुन आली होती. बिग बी यांच्या या पार्टीला बॉलिवूडचे अनेक दिग्गज चेहरे पाहिला मिळाले.  मात्र सगळ्यांच्या नजरा तेव्हा खिळल्या जेव्हा न बोलवताही रेखा तिथे आली.  नेहमीप्रमाणे भरजडी बनारसी साडी रेखा आली तेव्हा तिचं सौंदर्य पाहून अनेकांना उमराव जानमधील रेखाची आठवण झाली. यावेळी प्रत्येकाची नजर रेखावर होती, अगदी कॅमेऱ्यांनी रेखाला कैद करण्यासाठी धावपळ केली. पण या रेखा बिग बींच्या वाढदिवसला कशी पोहोचली ? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात सुरु होता. 


मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं गेलं की, रेखा यांना कल्पना नव्हती की त्या हॉटेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पार्टी सुरु आहे ते. ज्यावेळी त्यांना हे समजलं त्या हॉटेलमधील वॉशरुममध्ये धावत गेल्या आणि स्वत:ला त्यांनी कोंडून घेतलं असं म्हटलं जातं. आपली उपस्थिती पाहून माध्यमांना नवीन गॉसिफ मिळेल या भीतीने रेखा तिथून निघून गेल्या होत्या. 


1976 मध्ये ' दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि रेखा यांची भेट झाली होत. असं म्हणतात की, यानंतर त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. अमिताभ यांचं जया बच्चन यांच्याशी लग्न झाल्यामुळे मीडियातून अमिताभ आणि रेखा यांच्या अफेयरवर चर्चा रंगू लागल्या होत्या. खरं तर अमिताभ आणि रेखा यांच्यातील नातं हे फार कमी लोकांनाच माहिती आहे. असंही म्हटलं जातं की, जया बच्चन यांना अमिताभ रेखा यांच्या अफेयरबद्दल कळलं. तर त्यांनी रेखाला एकदा घरी जेवण्यासाठी बोलवलं होतं. अमिताभ बच्चन तेव्हा घरी नव्हते. जया यांनी रेखासोबत जेवण केल्यानंतर त्या रेखा यांना दारावर सोडण्यासाठी गेल्या. तेव्हा त्या एकच वाक्य म्हणाल्यात, मी अमिताभ यांना सोडणार नाही. जया यांच्या या वाक्यानंतर रेखा यांनी अमिताभसोबतच नातं तिथेच संपवलं, असं म्हटलं जातं.