…म्हणून अमिताभ बच्चनसोबत कधीच काम करत नाहीत सुभाष घई? कारण ऐकून थक्क व्हाल
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचं असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत प्रत्येक कलाकाराला तसंच प्रत्येक दिग्दर्शकाला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. तर दुसरीकडे दिग्दर्शक सुभाष घई हे देखील असे दिग्दर्शक होते ज्यांच्यासोबत प्रत्येक कलाकाराला काम करायचं होतं.
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई 24 जानेवारीला त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 24 जानेवारी 1945 साली त्यांचा जन्म झाला. हिंदी चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक म्हणून आत्ता पर्यंत सुभाष घई अनेक हिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. 80 आणि 90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रमुख आणि यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी ते एक होते. मात्र आज आम्ही सुभाष घई यांच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय आम्ही बोलत आहोत सुभाष घई आणि अमिताभ बच्चन यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचं असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत प्रत्येक कलाकाराला तसंच प्रत्येक दिग्दर्शकाला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. बॉलिवूडचे शोमॅन म्हणूनही सुभाष घई यांना ओळखलं जायचं. एकावर एक हिट सिनेमा दिल्यानंतर त्यांना शोमॅन हे नाव पडलं. बॉलिवूडचे सगळे हिट स्टार राज कुमार, दिलीप कुमार, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त या सगळ्यांनी सुभाष घी यांच्या सिनेमात काम करुन प्रसिद्धी मिळवली पण या दिग्दर्शासोबत कधीच बींग बींनी काम केलं नाही. या दोघांचा कधीच एकत्र एक सिनेमा होवू शकलेला नाही. असं नेमकं का आणि कशासाठी झालं असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
सुभाष घई यांची सिनेमा बनवण्याची आणि सिनेमाची स्टोरी सांगण्याची पद्धत खूप वेगळी होती. त्यांच्या सिनेमात काम करणं ही यशाची खात्री मानलं जायची मात्र असं काय कारण होतं ज्यामुळे अमिताभसोबत सुभाष घईंनी कधी काम केलं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, असं एकदा झालंही होतं की, सिनेमाचा संपुर्ण प्लानिंग झालं होतं तसंच सिनेमाची अनांउन्समेंटही केली गेली मात्र मात्र दोघांमध्ये १ गोष्टीनंतर असं काही झालं की सगळं तिथेच थांबलं. चला जाणून घेवूया नेमकं काय झालं.
1987 साली सुभाष घई यांनी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स ठेवली. ज्यामध्ये त्यांनी माहिती दिली की ते 'देवा' नावाचा सिनेमा बनवणार आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असतील. या सिनेमात ते डाकूच्या भूमिकेत दिसतील. सिनेमासाठी मुहूर्तही ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन डाकू जसे हातात मशाल घेवून दिसले होते. अमिताभ यांनी या निमीत्ताने काही डायलॉग्सही म्हटले होते. त्यांचा या सिनेमातील लूक थोडाफार 'खुदा गवाह' सिनेमासारखा होता.
मुक्ता आर्टच्या बॅनरखाली बनत असलेल्या या सिनेमावर केवळ १ आठवडाच काम झालं आणि यानंतर पुन्हा एकदा सुभाष घई यांनी प्रेस कॉन्फरन्स ठेवली, यावेळी त्यांनी सांगितलं की, देवा हा सिनेमा बंद पडला. आणि यामागे त्यांनी क्रिएटिव डिफरेंसेज असं कारण दिलं. मात्र सत्यता काही वेगळीच होती. खरंतर सिनेमाच्या सेटवर जेव्हा अमिताभ स्क्रिप्ट वाचत होते. तेव्हा त्यांना काही गोष्टी समजल्या नाही. अशातच त्यांनी त्यांच्या मॅनेजरला घईंकडे पाठवलं आणि मॅसेज दिला की, स्क्रिप्टविषयी बोलण्यासाठी अमिताभ यांनी तुम्हाला बोलवलं आहे.
जेव्हा मॅनेजर हा मॅसेज घईंकडे गेला तेव्हा त्यांना ही गोष्ट बिलकूल आवडली नाही. त्यांनी त्यांच्या मॅनेजरकडे पुन्हा मॅसेज पाठवला की, जर अमिताभ यांना काही चर्चा करायची असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं. ही गोष्ट जेव्हा अमिताभ यांना समजली तेव्हा त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि ते सेटवरुन उठून निघून गेले यानंतर अमिताभ बच्चन सेटवर कधीच आले नाही. शोमॅनने देखील यावर कोणतीच त्यांच्याकडे चर्चा केली नाही आणि जवळपास आठवड्याभरानंतर सिनेमा बंद पडत असल्याची घोषणा केली. त्यामुळे यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.