उषा नाडकर्णींना का बोलतात `आऊ`?
मराठी तसेच बॉलिवूडमध्ये ज्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा दबदबा आहे ती व्यक्ती म्हणजे उषा नाडकर्णी. मराठी तसेच हिंदी मालिका, हिंदी सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी या लोकप्रिय आहेत. खास्ट सासू म्हणून उषा नाडकर्णी यांना प्रेक्षकांनी `माहेरची साडी` या सिनेमांतून पाहिलच आहे.
मुंबई : मराठी तसेच बॉलिवूडमध्ये ज्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा दबदबा आहे ती व्यक्ती म्हणजे उषा नाडकर्णी. मराठी तसेच हिंदी मालिका, हिंदी सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी या लोकप्रिय आहेत. खास्ट सासू म्हणून उषा नाडकर्णी यांना प्रेक्षकांनी 'माहेरची साडी' या सिनेमांतून पाहिलच आहे.
उषा नाडकर्णी या कठोर, कडक शिस्तीच्या वाटत असल्या तरीही मराठी आणि बॉलिवूडमधील सहकलाकार त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. प्रत्येकाला उषा नाडकर्णी यांच्याबद्दल एक वेगळा आदर आहे. आपल्या अभिनयाने आणि कडक शिस्तीने उषा नाडकर्णी यांनी प्रत्येकाला जवळ केलं आहे. वयाच्या 72 वर्षी देखील त्यांची अभिनयातील एनर्जी ही खरंच कौतुकास्पद आहे. आताच सुरू झालेल्या बिग बॉस मराठीमध्ये सर्वात ज्येष्ठ कलाकार उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे.
यामुळे 'आऊ' ही हाक मारतात
उषा नाडकर्णी यांनी अनेक मराठी सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं आहे. उषा नाडकर्णी यांना मराठी आणि हिंदी या सिनेसृष्टीत 'आऊ' या नावाने संबोधलं जातं. हे आऊ हे नाव कसं पडलं? तर नशिबवान या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान उषा नाडकर्णी यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. लहान असलेला हा मुलगा उषा नाडकर्णी यांना 'आऊ' 'आऊ' अशी हाक मारत असे. त्यानंतर नशिबवानच्या सेटवर अभिनेत्री अल्का कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ये देखील त्यांना आऊ.. आऊ... अशी हाक मारत असे. त्यानंतर संपूर्ण क्रू, सेटवरील सगळी मंडळी उषा नाडकर्णी यांना आऊ.. आऊ अशी हाक मारत. आणि आता त्यांना आऊ या नावाने सगळेचजण हाक मारतात.
72 व्या वर्षी घेतलं स्वतःच घरं
बिग बॉस मराठीच्या सेटवर जेव्हा उषा नाडकर्णी आल्या. तेव्हा या शोतील सर्वात ज्येष्ठ स्पर्धक म्हणून उषा नाडकर्णी यांच्याकडे पाहण्यात आलं. यावेळी सांगताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की, मी वयाच्या 70 व्या वर्षी स्वतःच घर स्वतः विकत घेतलं आहे. तसंच मी त्या घरात एकटी राहते. आणि मला गाडी घ्यायची होती. मी स्वतः गाडी देखील विकत घेतली आहे.
जाणून घ्या उषा नाडकर्णी यांच्याबद्दल
उषा नाडकर्णी यांचा 13 सप्टेंबर 196 चा जन्म. त्यांच मूळ गाव कर्नाटक. सदानंद कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांच नाव तर आई या शिक्षिका होत्या.