मुंबई : अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला आहे. आता दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.  मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. जॉर्जिया मलायाकपेक्षाही फार सुंदर दिसते. जॉर्जिया कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अभिनेत्री  शहनाज गिलला कॉपी करताना दिसत आहे. 



जॉर्जियाने इन्स्टाग्रामवर शेहनाजच्या आवाजातील एका व्हिडीओवर ऍक्टिंग केली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मी आणि ओव्हरऍक्टिंग?' असं लिहीलं आहे. 


सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने शेहनाजला देखील टॅग केलं आहे. शेहनाजला कॅपी केलेला जॉर्जियाचा व्हिडीओ चाहत्यांना देखील फार आवडत आहे.