... यामुळे जितेंद्र सफेद रंगाचे कपडे घालायचे, पहिल्यांदाच स्वतः केला खुलासा
जितेंद्र यांच्या अभिनयासोबतच ही सवय देखील चाहते करायचे फॉलो
मुंबई : बॉलिवूडमधील जम्पिंग जॅक अभिनेता जितेंद्र (Jitendra) आपल्या स्वच्छंदी स्वभावामुळे ओळखले जातात. जितेंद्र खूप कमी कोणत्या सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहतात. पण हल्लीच ते 'इंडियन आयडल 12' मध्ये मुलगी एकता कपूरसोबत उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील एक महत्वाची गोष्ट सांगितली.
अनेकदा अभिनेता जितेंद्र यांना सफेद रंगाच्या कपड्यांमध्येच पाहिलं आहे. या मागचं काही खास कारण आहे का? कारण जितेंद्र यांची ही सवय त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्या काळी फॉलो केली होती. अनेकदा जितेंद्र सफेद रंगाची पँट, सफेद रंगाचे शूज आणि वरती वेगवेगळ्या रंगाचे टीशर्ट घालत असतं. त्यांची ही स्टाइल अनेकांनी फॉलो केली होती.
जितेंद्र यांनी गुपित उलगडलं
जितेंद्र यांना सफेद रंग अतिशय लोकप्रिय आहे. सफेद रंगाचे कपडे त्यांना खूप आवडतात. अगदी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन त्यांना सफेद रंगाचे कपडे घालायला आवडतात. पुढे जितेंद्र यांनी त्यामागचं खरी परिस्थिती सांगितली.
जितेंद्र म्हणाले, मी जेव्हा सिनेमांत आलो तेव्हा डिझाइनर्स नव्हते. जे आम्हाला आवडायचं ते आम्ही घालायचो. मला सफेद रंग आवडायचा. तसेच एकाने मला कॉन्शियस केलं होतं. सफेद रंगांच्या कपड्यात आपण बारिक म्हणजे स्लिम दिसतो. तसेच इतर रंगाच्या कपड्यांत उंची देखील कमी दिसते. हलक्या, लाइट रंगाच्या कपड्यात हाइट देखील कमी दिसते. मग लाइट रंगाच्या कपड्यांत सफेद रंगंच बेस्ट आहे. यामुळे मी सफेद रंगाचे कपडे घालायला सुरूवात केली.