मुंबई : काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गौतम किचलू सोबत लग्न केलं. काजलच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काजलने कोरोनाच्या काळात लग्न केलं याची देखील चर्चा झाली. या महामारीतच लग्न करण्याचा निर्णय काजलने का घेतला याचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vogue सोबत मुलाखत देताना काजलने याबाबत खुलासा केला आहे. मी आणि गौतम तीन वर्षे एकमेकांना डेट करत आहोत. तर गेल्या सात वर्षांपासून आम्ही एखमेकांचे मित्र आहोत.'


आम्ही एकमेकांना अनेकदा भेटतो. माझी सोशल पार्टी असो वा प्रोफेशनल एन्डीवर यामध्ये तो कायमच माझ्यासोबत असतो. लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो नाही तेव्हा आम्ही राहूच शकलो नाही. मग आम्ही एका ग्रोसरी स्टोरमध्ये मास्क लावून एकमेकांना भेटला. तेव्हा जाणीव झाली की आता भेटायला हवंच. म्हणून आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. 


गौतमने प्रपोझल केल्यानंतर काजलने म्हटलं की,'गौतम फिल्मी नाही आहे. यामुळे मी त्याचा खूप कृतज्ञ आहे.' हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या विवाहसोहळ्यातील फोटो अखेर समोर आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो समोर आला आहे. ज्यामुळं चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे.


इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये काजल सुरेख अशा लेहंग्यामध्ये दिसत आहे. तर, तिचा पतीसुद्धा शेरवानीमध्ये रुबाबदार दिसत आहे. लाल, गुलाबी, सोनेरी अशा रंगाना प्राधान्य देत काजल आणि गौतम किचलू यांचा वेडिंग लूक परिपूर्ण करण्यात आला होता. याला जोड मिळाली ती म्हणजे दागिन्यांची आणि अर्थातच अद्वितीय आनंदाची.