मुंबई : 70 वर्ष जुन्या आरके स्टुडिओ विकला जाणार आहे. हा स्‍टूडियो मुंबईच्या चेंबूर भागात आहे. एकूण 2 एकरमध्ये हा संपूर्ण स्टुडिओ पसरला आहे. राज कपूर यांनी 1940 मध्ये या स्टुडिओची स्थापना केली होती. 1988 मध्ये राज कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंबिय हा स्टुडिओ चालवत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर यांच्या माहितीनुसार, भविष्यात त्यांच्या मुलांमध्ये संपत्तीबाबत वाद होऊ नये म्हणून म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ऋषी कपूर यांनी म्हटलं की, 'आम्ही आमच्या हृद्यावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे.


कपूर कुटुंबियांनी स्टुडिओ विकण्यासाठी कोणतीही तारीख अजून ठरवलेली नाही. पण कपूर कुटुंबियांनी स्टुडिओ विकण्याचं काम एका प्रॉपर्टी टीमला दिलं आहे. मुंबईच्या चेंबूर भागात असलेल्या या स्टुडिओची किंमत किती असेल याची माहिती घेण्यासाठी रियल इस्टेट, व्यापारी, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरट सेक्टर सोबत चर्चा केली जाणार आहे.


कपूर कुटुंबियांनी हा निर्णय खूप विचार आणि चर्चा करुन घेतला आहे. राज कपूर यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे तीन मुलं आहेत तर रिमा जैन आणि रितु नंदा या 2 मुली आहेत.