मुंबई : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने ३२० कोटी रुपयांची कमाई केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. प्रभासने अनेक चित्रपटामध्ये लव्हर बॉयची भूमिका साकारली आहे. परंतू त्याने आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात किसिंग सिन केले नाही. चित्रपटात किसिंग सिन न करण्याबाबद खुद्द प्रभासने खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान प्रभासला ऑनस्क्रिन सिनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की, 'चित्रपटामध्ये असे सिन करणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे चित्रपटात किसिंग सिन करणं मी टाळतो.'


प्रभासच्या चाहत्यांना माहित आहे की तो फार लाजाळू आहे. 'साहो' चित्रपटानंतर तो एक रोमॅन्टीक कथानक असलेल्या चित्रपटात झळकणार आहे. राधाकृष्ण दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री पूडा हेगडे भूमिका साकारणार आहे. 


बुधवारी यूएईमध्ये चित्रपटाचे स्क्रिनींग ठेवण्यात आले होते. जमलेल्या काही चित्रपट समिक्षकांनी 'साहो'चे तोंड भरून कौतुक केले. ऍक्शन-थ्रिलर चित्रपटाला समिक्षकांनी ४ स्टार देखील दिले. सकारात्मक प्रतिक्रियां नंतर काही समिक्षकांनी चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रीया दिल्या आहेत. 


तब्बल ३५० कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ यांनी केले आहे. परदेशातून चित्रपटावर नकारात्मक प्रतिसाद उमटल्यानंतर आता हा चित्रपट भारतात चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहाणे महत्वाचं ठरणार आहे.