मुंबई : बिग बॉसच्या ११ चा होस्ट सलमान खानने प्रियंका चोप्राच्या कंडोमची अॅड न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पण सलमान खान सिनेमामध्ये ही कधी किसिंग सीन करत नाही. काय आहे याचं कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान नेहमी म्हणतो की बिग बॉस हा एक फॅमिली शो आहे. लहान व्यक्तीपासून मोठे व्यक्ती हा शो बघतात. अनेकदा बिग बॉसमध्ये स्पर्धकांनी काही आक्षेपार्ह हरकती केल्यावर देखील सलमान खान त्यांना इशारा देतो. पण आता प्रियंका चोप्राच्या कंडोमच्या अॅडवर सलमानने हरकत घेतली आहे.


म्हणून नाही करत किसिंग सीन


सलमान हा एक फॅमिली मॅन आहे. तो स्वत: सिनेमांमध्ये किसिंग सीन देत नाही. सलमानचं म्हणणं आहे की त्याची आई त्याचे सिनेमे बघते. त्यामुळे तो किसिंग सीन करत नाही. सिनेमामध्ये जर त्याने तसा सीन केला तर यामुळे त्याच्या आईला वाईट वाटायला नको. बिग बॉसच्या बाबतीतही त्याने असाच काही निर्णय घेतला आहे. सलमानने शो दरम्यान ही अॅड न दाखवण्याचं चॅनेला सल्ला दिला आहे.


ऑडिसन्स मध्ये कोणत्याही वयाचा व्यक्ती असतो. त्यामुळे कोणते सीन करावे आणि कोणते नाही हे त्याच्या प्रेक्षकांवरुन ठरवलं जातं. सलमान खान याबाबतीत खूपच जपतो. बोल्ड सीन करणं तो टाळतो.