Sonakshi Sinha:  बॉलिवूड अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि  हुमा कुरेशी (Huma Qureshi) या दोघी त्यांच्या येणाऱ्या  'डबल एक्सएल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची त्याला चांगलीच पसंती मिळाली. सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत काही व्हिडिओ तर प्रचंड व्हायरल देखील होतात. त्या व्हिडिओमुळे त्यांनी त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप मस्ती केलेली दिसत आहे. त्यातच बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने खुलासा केला आहे की तिला 'डबल एक्सएल'च्या सेटवर अनेकदा सर्वांना परिस्थितीतीची जाणीव करुन द्यावी लागत असे. (why sonakshi sinha angry on double xl movie star cast nz )


हे ही वाचा - Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ती म्हणाला की सेटवर एवढ्या गप्पाटप्पा आणि विनोद व्हायचे की चित्रपटाच्या शूटिंगची आठवण करून द्यावी लागत असे. ती म्हणाली, “आम्ही चौघांनीही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप मज्जा केली आहे. कुठे थांबायचे आणि कामाला सुरुवात करायची हे आम्हाला कधीच कळत नव्हते पण फक्त एकच व्यक्ती होती जिला सगळ्यांना जागं कधी करायचे आहे हे माहीत होते आणि ती माझ्याशिवाय दुसरी कोणीही नव्हती. गांभीर्य परत आणण्यासाठी मी त्यांना नियंत्रित करायचे जेणेकरून आम्ही सर्व वेळेवर काम करू शकू. ”


हे ही वाचा - श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या 



IANS च्या अहवालानुसार, आपण झीरो फिगर किंवा टोन्ड बॉडी हे सौंदर्याचे मोजमाप आहे हे समजतो, तेव्हा 'डबल एक्सएल' समाजाने सेट केलेले हे सर्व नियम तोडते आणि सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी स्टारर चित्रपट दोन अधिक आकाराच्या महिलांची कथा समोर आणते. 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'डबल एक्सएल'चे कलाकार सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, झहीर इक्बाल, महत राघवेंद्र आणि दिग्दर्शक सतराम रमानी यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये असणार आहेत.


हे ही वाचा - Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS



जेव्हा कलाकारांनी चित्रपटाबद्दल बोलले तेव्हा सोनाक्षीने होस्ट कपिल शर्माला सांगितले की चित्रपटाचे शूटिंग इतके मजेदार होते की ते सेटवरील काम विसरून जायचे आणि नंतर तिला त्यांना शूटिंगबद्दल गंभीर होण्यास सांगावं लागत असे. त्याचे वरिष्ठ म्हणून सांगताना झहीर म्हणाला की, शोमध्ये येण्यापूर्वी त्याने आम्हा तिघांना योग्य वागण्याचा इशारा दिला होता.