तुषार कपूरनं का नाही केलं लग्न? सरोगसीच्या मदतीनं वडील होण्या मागचं कारण समोर
Tusshar Kapoor : तुषार कपूरनं आजपर्यंत लग्न का केलं नाही आणि लग्न करण्या आधीच सरोगसीच्या माध्यमातून वडील होण्याचा निर्णय का घेतला? त्याविषयी खुलासा केला आहे.
Tusshar Kapoor : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरनं 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावर्षी त्याचा 'मुझे कुछ कहना है' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यू या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, तो एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही म्हणून त्यानं निर्माता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तुषारनं लग्न केलं नाही, तर सरोगसीच्या माध्यमातून तो वडील झाला. तुषारनं त्या मागचं कारण काय आहे हे एका मुलाखतीत सांगितले.
तुषारनं ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की त्याला कोणासोबत स्वत:ला वाटायचं नव्हतं. त्यानं वडील होण्याचा निर्णय देखील तेव्हाच घेतला जेव्हा त्याला वाटलं की तो सगळी जबाबदारी घेण्यास तयार आहे. 2016 मध्ये IVF च्या मदतीनं तुषार कपूरच्या आयुष्या त्याचा मुलगा लक्ष्य आला. तर करीना कपूरच्या एका शोमध्ये देखील तुषारनं सांगितलं की तो सिंगल फादर यासाठी झाला कारण त्याला स्वत: चं मुलं हवं होतं. त्यामुळे दत्तक घेण्या ऐवजी त्यानं सरोगसीची मदत घेतली.
एकता कपूरनं देखील केलं नाही लग्न
एकता कपूरनं देखील लग्न केलं नाही. सरोगसीच्या मदतीनं ती सिंगल मदर झाली. तिच्या मुलाचं नाव रवी आहे. हे नाव तिचे वडील जितेंद्र यांचे खरे नाव आहे. तिच्या वडिलांनी अट ठेवली होती की एकतर लग्न कर किंवा मग काम कर. त्यावेळी एकतानं तिच्या कामाला प्राधान्य देत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
तुषार कपूरचं नाव राधिका आप्टेशी जोडण्यात आलं. त्यानंतर तुषारनं सांगितलं होतं की हा एक पब्लिसिटी स्टंट होता. तुषारच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2006 मध्ये त्यानं 'गोलमालः फन अनलिमिटेड' या चित्रपटात काम केलं होतं. हा त्याचा तिसरा सुपरहिट चित्रपट होता. त्याचा दुसरा हिट असलेला चित्रपट 'क्या कूल हैं हम' होता. 'गोलमाल' या चित्रपटात अजय देवगण, श्रेयस तळपदे, अरशद वारसी सारखे अनेक मोठे कलाकार या चित्रपटात होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यानंतर त्याचे आणखी तीन चित्रपट आले.