Vidya Balan Bhool Bhulaiyaa 2 : 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटाचा तिसरा भाग काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्यानंतर बऱ्याच वर्षानं त्याचा दुसरा भाग आला आणि आता तिसरा भाग येतोय त्यामुळे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान, जेव्हा टी-सीरीजचे हेड भूषण कुमार यांनी 'भूल भुलैया 2' बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी विद्या बालनला या चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र, विद्यानं त्यावेळी नकार दिला होता. याचा खुलासा स्वत: याविषयी खुलासा केला असून त्या मागचं कारण देखील सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माते भूषण कुमार यांनी चित्रपटातील 'आमी जे तोमार 3.0' या गाण्याच्या लॉन्चच्या कार्यक्रमाच्या वेळी हा खुलासा केला आहे. भूषण कुमार म्हणाले, 'भूल भुलैया 2' च्या वेळी मी विद्याशी संपर्क साधला होता, पण त्यांनी नकार दिला. जेव्हा आम्ही ट्रेलर लॉन्च करत होतो, तेव्हा आम्ही तिला कमीत कमी त्याचा भाग हो अशी विनंती केली, त्यामुळे तिनं ट्रेलर पोस्ट केला.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

भूषण कुमारनं पुढे सांगितलं, 'खरंतर तिला ट्रेलर खूप आवडला होता आणि चित्रपटही आवडला. मग तिनं मला वचन दिलं की ती नक्कीच तिसऱ्या भागाचा काम करणार. मी इतक्या मोठ्या सेटअपला घेऊन खूप उत्साही आहे. त्यामुळे आम्ही सगळे खूप उत्साही आहोत.'


का दिला 'भूल भुलैया 2' ला नकार?


विद्या बालननं याविषयी सांगितलं की मी खूप घाबरले होते की कारण 'भूल भुलैया' नं मला खूप काही दिलं. मी सांगितलं की जर मी काही गडबड केली तर जे मिळालं आहे ते सगळं निघून जाईल. मी अनीस बज्नीला सांगितलं की मला असं कोणतही विनाकारण धाडस घेऊ शकत नाही. पण जेव्हा 'भूल भुलैया 3' तो माझ्याकडे आला, तेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि मला ती स्क्रिप्ट खूप आवडली. तर मला स्क्रिप्ट खूप आवडली. कार्तिक आर्यन होता आणि मला 'भूल भुलैया 2' देखील खूप आवडली होती. त्यात आणखी चांगली गोष्ट म्हणजे माधुरी दीक्षित होती. त्यामुळे हे आणखी चांगलं झालं आणि मी हिंम्मत केली. 


हेही वाचा : चक्क PM मोदींचा फोटो वापरुन KBC च्या नावाने फसवणूक! थेट CBI ने घेतली दखल


दरम्यान, 'भूल भुलैया 3' विषयी बोलायचं झालं तर या चित्रपटातील 'आमी जे तोमार 3.0' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे असं म्हणता येईल. तर 'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ति डिमरी, संजय मिश्रा, अश्विनी कालेसकर, राजपाल यादव, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन दिसणार आहेत. तर हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.