चक्क PM मोदींचा फोटो वापरुन KBC च्या नावाने फसवणूक! थेट CBI ने घेतली दखल

Fraud in the name of PM Modi for KBC 16 : ‘कौन बनेगा करोडपति 16’ च्या नावावरून केली फसवणूक, तर फसवणूकीसाठी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर 

दिक्षा पाटील | Updated: Oct 27, 2024, 12:18 PM IST
चक्क PM मोदींचा फोटो वापरुन KBC च्या नावाने फसवणूक! थेट CBI ने घेतली दखल title=
(Photo Credit : Social Media)

Fraud in the name of PM Modi for KBC 16 : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति 16’ हा सगळ्यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत शोचे लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शोची प्रेक्षक रोज आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात. त्यात एका व्यक्तीनं दावा केला आहे की करोडपतिमध्ये सगभागी होण्यासाठी आणि 5.6 कोटी जिंकाल अशी खोटी बतावणी एका महिलेनं केली आणि 3 लाख रुपयांची त्यांची फसवणूक केली. तर ती महिला सीबीआयची ऑफिसर असल्याचं सांगत होती. इतकंच नाही तर हे सगळं खोटं पटवून देण्यासाठी त्या खोट्या सीबीआय ऑफिसर महिलेनं त्या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा खोटा फोटो देखील पाठवला.

फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीनं दावा केला की त्या महिलेनं फोनवर 5.6 कोटी जिंकाल असं खोटं आश्वासन देत 3 लाख रुपयांची फसवणूक केली. या सगळ्यानंतर सीबीआयच्या नावावर फसवणूक आणि आयटी ॲक्टच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयनं या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यात सांगितलं की एका महिलेनं स्वत: ला सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याशिवाय पंतप्रधानांसोबतचा खोटा फोटो पाठवत ती खरं बोलते हे पटवून दिलं. फसवणूक करण्यासाठी पंतप्रधानांचा फोटो वापरल्यानं पीएमओनं सीबीआयकडे ही तक्रार केली आणि त्यानंतर सीबीआयनं गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

KBC 16 Fraud PMO Filled case to cbi after a person got cheated with using Pm modi s photo

सीबीआयनं दाखल करून घेतलेल्या या तक्रारित म्हटलं आहे की 'केबीसी मुंबईनं सांगितलं की तक्रार करणाऱ्याला सांगितलं की तो 25 लाख रुपये जिंकला आहे आणि त्याला वाढवून 5.6 कोटी रुपये करण्यात आले.'

हेही वाचा : 'विमान अपघातात तुमच्या लेकीचं निधन झालं'; काजोलच्या आईला तो फोन कॉल आला अन्...

दरम्यान, या शोविषयी बोलायचं झालं तर यावेळची दिवाळी ही खास असणार आहे. त्याचं कारण म्हणजे या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हजेरी लावणार आहे. यावेळी तो त्याची सीरिज ‘सिटाडेल हनी बनी’ च्या प्रमोशनसाठी आला आहे. ही सीरिज 7 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. वरुण धनवसोबत या सीरिजमध्ये समांथा रुथ प्रभू दिसणार आहे. त्यामुळे आता पुढच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.