Vijay Deverakonda : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडानं खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजयनं त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. विजय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण विजय एकदा चर्चेत आला होता आणि त्याचं कारण होतं त्यानं त्याचा पहिला फिल्मफेयर अवॉर्डचा लिलाव केला होता. हा अवॉर्ड विजयनं 25 लाख रुपयात विकला. या गोष्टीमुळे लोकांनी फक्त आश्चर्य व्यक्त केलं नव्हतं तर त्यासोबत ट्रोल देखील केलं होतं. आता विजयनं सांगितलं की त्यानं असं का केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय देवरकोंडानं 2016 मध्ये 'पेली चूपुलु' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर विजयला दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाच्या 'अर्जुन रेड्डी' मध्ये केलेल्या त्याच्या अभिनयासाठी पुरस्कार पटकावला होता. तर त्याचा दुसराच चित्रपट होता. तर विजयनं या चित्रपटासाठी मिळालेल्या त्याच्या या पुरस्काराचा लिलाव का केला याचा खुलासा Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत विजयनं सांगितलं. त्यानं म्हटलं की "अवॉर्डचा लिलाव केल्यानंतर जे पैसे मिळाले ते मी दान केले आणि ही माझ्यासाठी असलेली आजवरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी या अवॉर्डमधून मिळालेले 25 लाख रुपयांची रक्कम ही मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीसाठी देणगी दिली." 



याच मुलाखती दरम्यान, विजय देवरकोंडानं हे देखील सांगितलं की त्याला मिळालेले अवॉर्ड्स कुठे कुठे आहेत. खरंतर विजयला विचारण्यात आलं की त्याच्या घरात अवॉर्ड्स ठेवण्यासाठी एक ठरावीक जागा किंवा शेल्फ आहे का? यावर विजयनं सांगितलं की "काही अवॉर्ड्स हे माझ्या ऑफिसमध्ये आहेत, काही माझ्या आईनं घरी ठेवले आहेत. मला माहित नाही की कोणते माझे आहेत, कोणते आनंदचे आहेत. (आनंद हा विजयचा भाऊ आहे). काही मी देऊन टाकतो, त्यापैकी एक मी संदीप रेड्डी वांगाला दिली आहे. आम्ही फिल्मफेयरकडून मिळालेल्या माझ्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचा लिलाव केला. त्यातून देणगीचा काही मोठा भाग मिळाला. ही माझ्यासाठी माझ्या घरी असलेल्या एका दगडाच्या तुकड्यापेक्षा ही चांगली आठवण आहे."


हेही वाचा : अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'


विजयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'फॅमिली स्टार' या चित्रपटात दिसणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.