न्यूयॉर्क शहरातील शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टने पुन्हा एकदा फॅशन जगतातील मोस्ट अवेटेड इव्हेंट, 'मेट गाला'चे आयोजन केले. मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी सेलिब्रिटी, डिझायनर आणि फॅशन प्रेमी 'फॅशनची सर्वात मोठी रात्र' म्हणून ओळखले जाणारे साक्षीदार होण्यासाठी जमले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षीची थीम, 'स्लीपिंग ब्युटीज: रीवॉकिंग फॅशन' असे आहे. या थीममधून अनेकांना या क्षेत्राचं दालन खुलं करण्याचं वचन दिले आहे. 'द गार्डन ऑफ टाईम' या ड्रेस कोडसह, अतिथींनी निसर्गाच्या सौंदर्याचे सार आत्मसात करणे अपेक्षित होते, जे युगानुयुगे फॅशनच्या उत्क्रांतीचे प्रमुख कारण ठरले आहे. 


पाहुण्यांनी कार्पेटवर पाऊल ठेवताच त्यांचे स्वागत एका सुंदर दृश्याने केले. मेट गालाचे रेड कार्पेट  अक्षरशः ग्रीट कार्पेटमध्ये म्हणजे बागेच्या नंदनवनात बदलले. हिरव्या रंगाच्या मऊ ओम्ब्रेने सजवलेल्या क्रीम रंगाच्या पायऱ्या, जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरला आहे, असा भास होत होता. या ग्रीन कार्पेटने कलाकारांचे स्वागत केले. 



हे ग्रीन कार्पेट फक्त कार्पेट नसून संवेदनांना मोहित करणारा गालिचा होता. पाहुण्यांना थीममध्ये तंबूच्या भिंती आणि आतील बाजू खास असा लूक दिलेला पाहायला मिळाल्या. 


(हे पण वाचा - Meta Gala : 163 कारागीर, 1965 तास... अशी तयार झाली आलिया भट्टची मनमोहक साडी)


मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिरवाई आणि फुलांनी सजवलेल्या भिंती रात्रीच्या खास सेलिब्रेशनसाठी अतिशय योग्य होत्या. तंबूच्या भिंतींवर पानांच्या झाडांच्या लार्जर दॅन लाइफ प्रतिमा दिसल्या, ज्यामुळे बागेचे सौंदर्य फुलले होते. कॉस्च्युम इन्स्टिट्यूटचे नवीन प्रदर्शन, 'स्लीपिंग ब्युटीज: रीवॉकिंग फॅशन' 400 वर्षांहून अधिक काळातील फॅशन इतिहासातील प्रतिष्ठित डिझाईन्सचे प्रदर्शन करते.  ज्यात एल्सा शियापरेली, ख्रिश्चन डायर, यवेस सेंट लॉरेंट आणि ह्यूबर्ट डी गिव्हेंची यासारख्या नामवंत डिझायनर्सच्या नावांचा समावेश आहे.


पण मेट गालाने पहिल्यांदा रेड कार्पेटला रिप्लेस केलं असं नाही. 2015 मध्ये चीनमध्ये मेट गालामध्ये ग्लास एडिशन पाहायला मिळालं. आतापर्यंत असंख्य डिझाइन आणि रंगानी हे कार्पेट सजवण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर पांढऱ्या रंगाच्या कार्पेटसोबत सोनेरी रंगानी देखील हे कार्पेट सजवण्यात आले. 
2019 मध्ये गुलाबी रंगाचं कार्पेट मेट गालामध्ये पाहायला मिळालं.