Meta Gala : 163 कारागीर, 1965 तास... अशी तयार झाली आलिया भट्टची मनमोहक साडी

Met Gala 2024: आलिया भट्ट सोमवारी मेट गाला 2024 मध्ये आपली एक वेगळी छबी उमटवताना दिसली. फॅशन जगतामध्ये आलिया भट्टने भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. 

| May 07, 2024, 08:23 AM IST

मेट गाला 2024 ची यंदाची थीम : 'गार्डन ऑफ टाइम' एन ऑड टू आर्ट ऍण्ड एटरनिटी.. या इव्हेंटमध्ये भारतीय अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडीसा निवडलं होतं. ही मनमोहक साडी सब्यासाचीने डिझाइन केली होती. सुंदर अशा या साडीमध्ये आलिया भट्ट अगदी राजकुमारीच दिसत होती. आलिया भट्टच्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. 

1/8

ट्रेडिशन आणि इनोवेशची प्रतिक आहे साडी

Alia Bhatt Met Gala

आलिया भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून तिच्या मेट गाला 2024 लुकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलियाने सांगितले की, साडी हे परंपरा आणि नवीनतेचे प्रतीक आहे. सब्यसाचीने ही साडी खूप सुंदर तयार केले. ही साडी भरतकाम, मौल्यवान खडे आणि झालरांनी बनवली होती. साडीतील झालर ही 1920 च्या काळातील एक खास शैली आहे.

2/8

ट्रेडिशन आणि इनोवेशची प्रतिक आहे साडी

Alia Bhatt Met Gala

आलिया भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून तिच्या मेट गाला 2024 लुकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलियाने सांगितले की, साडी हे परंपरा आणि नवीनतेचे प्रतीक आहे. सब्यसाचीने ही साडी खूप सुंदर तयार केले. ही साडी भरतकाम, मौल्यवान खडे आणि झालरांनी बनवली होती. साडीतील झालर ही 1920 च्या काळातील एक खास शैली आहे.  

3/8

पंच महाभूतांचा साडीमध्ये समावेश

Alia Bhatt Met Gala

या साडीमध्ये पृथ्वी, आकाश आणि समुद्र या रंगाचा समावेश आहे. यामध्ये साडीचं सौंदर्य आणि त्याचं वेगळेपण अधिक खुलून दिसत आहे. आलिया भट्टने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, साडी तयार करण्याचा अनुभव देखील खास आहे. अतिशय मजेदार आणि स्ट्रेसफुल असं देखील लिहिलं आहे. 

4/8

163 कारागिरांनी तयार केली साडी

Alia Bhatt Met Gala

आलिया भट्टने सांगितले की, कारागीर, भरतकाम करणारे, कलाकार आणि रंगरंगोटीसह 163 लोकांनी ही भव्य साडी बनवण्यात योगदान दिले. ही साडी बनवण्यासाठी एकूण 1965 तास लागले. आलिया भट्टच्या या साडीला एक लांब मॅचिंग वेल होता, जो तिला रॉयस लुक देत होता.

5/8

सुंदर मेकअप आणि हेअरस्टाइल

Alia Bhatt Met Gala

आलिया भट्टने मेट गाला 2024मध्ये नेसलेल्या साडीसोबतच हेअर आणि मेकअप देखील खास निवडला होता. आलियाची हेअरस्टाइल एक मेसी वेणीचा लूक होता. जो या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच आलियाने डोक्यावर मांग टिकासोबत पट्टी स्टाइलची एक्सेसरी निवडली आहे. जी अतिशय सुंदर दिसत आहे. 

6/8

ओव्हरऑल लूक अतिशय सुंदर

Alia Bhatt Met Gala

आलिया भट्टने लाइट मेकअपसोबतच लिपस्टिकचा देखील अतिशय सुंदर आणि नॅच्युरल शेड निवडला आहे. आलियाने कानात मोठ मोठे ईअररिंग्स कॅरी केले आहे. आलियाने गळ्यात काहीच घातलेलं नाही. तसेच आलियाने बोटांमध्ये सुंदर अंगठ्या घातल्या असून ओवलऑल हा लूक अतिशय सुंदर दिसत आहे. 

7/8

आलियाने ट्विटमध्ये म्हटलंय

Alia Bhatt Met Gala

एका ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'आलिया भट्ट अप्रतिम दिसत आहे. संस्कृतीचा आदर करणारी ही थीम आहे.' एका नेटिझनने लिहिले, 'आलिया भट्टने मेट गाला 2024 मध्ये सब्यसाची साडी नेसली.' एका युझर्सने सांगितले की, 'मेट गाला 2024 मध्ये आलिया भट्टने तिच्या संस्कृतीचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी साडीमध्ये खूप पुढे गेली आहे.'

8/8

सगळ्यांना आवडला आलियाचा लूक

Alia Bhatt Met Gala

'आतापर्यंतचा रात्रीचा आवडता आलियाचा लूक. आलिया भट्ट नेहमीच पेस्टल लूकमध्ये दिसते. ज्या पद्धतीने केसांची स्टाइल केली आहे ते मला आवडते. एका युझर्सने कौतुक केले आणि लिहिले, 'सब्यसाचीने तयार केलेल्या या साडीमध्ये आलिया भट्ट कमाल दिसत आहे!!!