मुंबई : मलायका अरोरा जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा जेव्हा-जेव्हा वर्कआउटसाठी बाहेर जाते तेव्हा तिची झलक सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय बनतो. नुकताच मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच चांगला धक्का बसला आहे. खरंतर, जिममध्ये जाताना मलायकाच्या मांडीवर एक मोठा काळा डाग होता. जो पाहताच तिच्या पायाला काय झालं म्हणून लोकं घाबरली होते. आता मलायकाने हे स्पष्ट केलं आहे की, तिच्या पायावर काळ्या खुणा कशाच्या दिसत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, यावेळीही काही लोकं असा प्रश्न विचारत होते की, हे दुखापतीचे डाग आहेत का आणि मलाइकाला ही दुखापत कशी झाली? मलायका हे मार्क्स सगळ्यांना का दाखवत आहेत, तिने ते झाकून ठेवावेत, असे काही जण विचारत होते. आता मलायकानेही या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक दरम्यान एका संभाषणात मलायका म्हणाली की, यात लपवण्यासारखे काय आहे? मी खरोखरच खूप वाईट पद्धतीने पडले होते.


'काही डाग जातात तर काही जात नाहीत'
मलायका पुढे म्हणाली, 'ही दुखापत वाढेल असं मी काहीही घालू शकत नव्हती. त्यामुळे मला हे असे कपडे घालावे लागले. ही जखम ओपन ठेवावी लागली.  माणूस आहे तो पडतोच. आणि दुखापतही होते तुम्ही पडलात की, तुम्ही उठता आणि पुढे जाताच. काही डाग राहतात तर काही डाग जातात. पण तेच खरं आयुष्य आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायकाने तिचा ४८ वा वाढदिवस दुबईत साजरा केला
मलायकाने नुकताच तिचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी मलायका तिच्या गर्ल्स गँगसोबत दुबईला पोहोचली होती आणि तिने तिचा वाढदिवस खूप एन्जॉय केला. मलायकाने स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री आकाशात उंचावरून उडी मारताना दिसत आहे.