मुंबई : मिस इंडिया राहिलेल्या युक्ता मुखीच्या आयुष्यातील एक कटू सत्य आपण आज जाणून घेणार आहोत. युक्ता मुखी सर्वात अगोदर मिस इंडिया झाली त्यानंतर तिने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये देखील एन्ट्री केली. मात्र आता गेली 10 वर्षे युक्ता लाइम लाइटपासून दूर आहे. असं नक्की तिच्यासोबत काय झाल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्ता मुखीने 1999 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. त्यानंतर त्याच वर्षी ती मिस वर्ल्ड देखील झाली. युक्ताचा जन्म 1979 मध्ये बंगलुरूच्या सिंधी कुटुंबात जन्म झाला. मात्र ती दुबईत राहिली. 1986 मध्ये युक्ताचं कुटुंब मुंबईत परतलं. मुंबईत येऊन युक्ताची आईने सांताक्रुझमध्ये एक ग्रूमिंग सलून उघडलं. तर युक्ताचे वडिल एका कपड्याच्या कंपनीत एमडी होते. युक्ताने मिस वर्ल्ड झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 2002 मध्ये 'प्यासा' हा सिनेमा केला. या सिनेमात युक्तीने आफताब शिवदासानीसोबत काम केलं. त्यानंतर 2006 मध्ये 'कटपुतली' या सिनेमात काम केलं आहे. यावर्षी आणखी एक सिनेमा प्रदर्शित झाला त्याचं नाव 'लव इन जापान'. 


बॉलिवूडमध्ये करिअर जमलं नाही 


युक्ताने सिनेमात करिअर करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर तिने आपला मोर्चा भोजपुरी सिनेमाकडे वळवला. युक्ताने 2008 मध्ये शेवटचा सिनेमा 'मेमसाब' केला. त्यानंतर तिला हळू हळू सिनेमे मिळणे बंद झाले. युक्ताची उंची 6.1 फूट आहे यामुळे देखील ती चर्चेत राहिली. मात्र असं सांगितलं जातं की, यु्क्ताची हीच उंची तिच्या यशाच्या आड आली. 2008 मध्ये युक्ताने न्यूयॉर्कमधील बिझनेसमन प्रिंस तुलीसोबत लग्न केलं. लग्नानंतर तिने एक दिमाखदार रिसेप्शन दिलं. काही वेळानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 2013 मध्ये एक अशी बातमी आली ज्यामुळे बॉलिवूडमध्ये गोंधळ झाला. 


युक्ता मुखीचा घटस्फोट या कारणामुळे 


युक्ता मुखीने आपला पती प्रिंस तुली विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात याची तक्रार नोंदवली आहे. तिने आपल्या नवऱ्यावर हुंडा आणि अनैसर्गिक सेक्स केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. युक्ता मुखीचे आपल्या नवऱ्यासोबतचे अनेक वाद चर्चेत राहिले. यानंतर 2014 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. मुलाची जबाबदारी युक्ता मुखीकडे आहे.