अभिनेता गोविंदावर का आली `हे` काम करण्याची वेळ?
हा व्हिडिओ गोविंदाच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
मुंबई : जर आपण बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपलबद्दल बोललो तर त्यात गोविंदा आणि त्याच्या पत्नीचं नाव नक्कीच सगळ्यात आधी डोळ्या समोर येतं. गोविंदाने अनेक वर्षांपूर्वी सुनिता आहुजासोबत लव्हमॅरेज केलं होतं आणि आताही दोघांमधील प्रेम पूर्वीप्रमाणेच कायम आहे. आजही दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग दिसून येते आणि दोघंही अनेकदा याचा पुरावा देतात. काही काळापूर्वी गोविंदा आणि त्याची पत्नी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, दोघंही कपिलच्या शोमध्ये पोहोचले आहेत आणि कपिल त्यांना एक व्हिडिओ क्लिप दाखवत आहे. या व्हिडीओमध्ये सुनीता आरामात खुर्चीवर बसली आहे आणि गोविंदाला तिचं सगळं काम करायला लावत आहे. कधी सुनीता गोविंदाकडून कपडे इस्त्री करत घेत आहे तर कधी ती फळं खात आहे. पळून जाऊन गोविंदा ज्या प्रकारे आपल्या पत्नीचे काम करत आहे. ते पाहून लोकांचं हसणं थांबत नाहीये. गोविंदा आणि सुनीता स्वतः देखील या मजेदार व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. 'तुम तो धोखबाज हो' या गाणं या व्हिडिओच्या मागे वाजत आहे.
हा व्हिडिओ गोविंदाच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'हिरो नंबर 1 जोरू का गुलाम बनला'. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिलं आहे की, 'ही जोडी सगळ्यात सुंदर आहे'. अशा अनेक मजेदार प्रतिक्रिया व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.