मुंबई : अद्याप सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता सुटलेला नाही. या दरम्यान सोशल मीडियावर सुशांतच्या संपूर्ण जीवनावर सिनेमा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या सिनेमात मुख्य कलाकार म्हणजे सुशांतची भूमिका एक पाकिस्तानी कलाकार साकारणार आहे. 


सुशांतची भूमिका पाकिस्तानी कलाकार साकारणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी हसन खान (Hasan Khan) इंस्टाग्रामवर दिवंगत अभिनेता सुशांतचा फोटो शेअर आणि एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्याने लिहिलं होतं की,''अलहमदोलिल्लाह, एक प्रोजेक्ट मिळाला आहे. जो माझ्या खूप जवळ आहे. भारतात वेबमध्ये सुशांतची भूमिका साकारायला मिळत आहे.'


यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली की, सुशांतच्या जीवनावर ओवर द टॉप प्लॅटफॉर्मर ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ हा सिनेमाची निर्मिती करू शकतो. 


काय आहे सत्य? 


ग्लोबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओने सांगितलं की, आम्ही सुशांतच्या जीवनावर आधारित कोणत्याच प्रोजेक्टवर काम करत नाही. एक अफवा पसरली होती, मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. पाकिस्तानी कलाकार हसन खान प्रमुख भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती. मात्र ते खरं नाही. 



पाकिस्तानी कलाकारने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. मात्र अशी कोणतीच अधिकृत माहिती ऍमेझॉन कठून देण्यात आलेली नाही. सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी १४ जून रोजी आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सर्वोच्च न्यायालयाने सोपवला आहे.