JNU वादावर सनीची प्रतिक्रिया
हिंसाचाराविरोधात सनीची प्रतिक्रिया...
मुंबई : जेएनयू वादावर अनेक बॉलिवूड कलाकार आपली मतं मांडत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सनीने याप्रकरणी कोणाचंही समर्थन न करता हिंसाचाराविरोधात चांगलीच टीका केली आहे. सनीने सर्वप्रकारच्या समस्या या संवादानेच सोडवल्या जाऊ शकत असल्याचं म्हटलंय.
ज्या विषयावर लोक भांडत आहेत, अशा विषयावर मला माझं मत मांडायचं नसल्याचं सनीने म्हणलंय. परंतु सनीने हिंसाचाराबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. जर आपण आपला अहंकार कमी केला तर आपण अनेक गोष्टी करु शकतो. कोणत्याही समस्या एकमेकांशी बोलून, हिंसा न करता अनेक गोष्टी सोडूव शकतो. हिंसा एक अशी गोष्ट आहे, जे आपली मुलं पाहतात आणि तेच शिकत असतात. हिंसेचा दूरगामी परिणाम होत असल्याचं सनीने म्हटलंय.
हिंसेचा परिणाम केवळ ज्यावर हल्ला करण्यात आला आहे त्या एकट्यावर होत नाही. तर आपल्या संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होत असतो. हिंसा भावनात्मकरित्या मुलं, आई-वडिल, बहीण सर्वांवरच प्रभाव पाडत असल्याचं सनीने सांगितलं.
मी शांततेचं समर्थन करते. मी कोणत्याही परिस्थितीत हिंसेचं समर्थन करणार नाही. कोणत्याही हिंसेशिवाय या समस्येचं निराकरण होईल अशी आशा सनीने व्यक्त केली आहे.