मुंबई : ICC World Cup 2019 साठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. ज्यानंतर, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकांनीच नव्या संघाच्या निवड प्रक्रियेविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कलाविश्वातूनही संघाविषयी काही प्रतिक्रिया आल्याचं पाहिलं गेलं. पण, या साऱ्यात एक सेलिब्रिटी मात्र नाराज असल्याचं पाहायला मिळालं. तो सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केआरके' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमालने ट्विटर अकाऊंटवरुन विश्च चषकासाठीच्या भारतीय संघाविषयी आपलं मत मांडलं. विराट कोहली याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपणाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण, त्याच्याच कर्णधार पदावर केआरकेने काही प्रश्न उपस्थित केला आहे. 'विराटचं आयुष्य हे पूर्णत: नकारात्मकता आणि शिवीगाळ याच गोष्टींनी व्यापलं आहे. त्यामुळे एक सकारात्मक खेळाडू म्हणून धोनीच संघाच्या कर्णधारपदी असावा.....', असं ट्विट त्याने करत नेटकऱ्यांनाही याविषयीचा प्रश्न केला. आपल्या प्रश्नावर त्याने नेटकऱ्यांचीही उत्तर मागवली. 



विश्व चषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांचा उल्लेख करत केआरकेने आणखी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्याने हा संघ तर, उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचणार नाही, असं मत मांडलं. त्याचं हे ट्विट पाहता आता विराट किंवा संघातील इतर कोणते कलाकार काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



हा आहे विश्व चषकासाठीचा भारतीय संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर