मुंबई : या जगात सर्वात सुंदर चेहरा कोणाचा? असं विचारलं असता तुम्ही लगेचच आपल्या प्रेयसीचं, पत्नीचं किंवा फारफारतर आईचं नाव घ्याल. हा झाला मजेचा विषय. पण, प्रत्यक्षात जर तुम्हाला कोणी प्रश्न केला की या जगात सर्वात सुंदर महिला कोण? तर या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात हे जग इतकं मोठं, त्यामध्ये असंख्य महिला. आता त्यातून सर्वात सुंदर कोण हे शोधायचं तरी कसं? पण, विज्ञानाच्या मदतीनं ही बाब सर्वांसमोर आली आहे की जगातील सर्वात सुंदर महिला कोण आहेत. 


एका ब्रिटीश सर्जननं ही माहिती सर्वांसमोर आणली आहे. वैज्ञानिक ज्ञानाचा आधार घेत त्यांनी महिलांच्या चेहऱ्यातील सौंदर्याची पारख केली आहे. यासाठी फेशियल मॅपिंग तंत्राचा वापर करण्यात आला आहे. (Worlds most beautiful woman kim kardashian amber heard read the selection process)


निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री एम्बर हर्ड ही जगातील पहिल्या क्रमांकाची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तर अभिनेत्री किम कार्दशियन ही दुसऱ्या क्रमांकाची सुंदर अभिनेत्री आहे. 



'स्टेट ऑफ द आर्ट फेस मॅपिंग डाटा'च्या माहितीनुसार ब्रिटीश सुपरमॉडेल केट मॉस ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सुंदर माहिती आहे. 




सौंदर्यवान महिलांची यादी तयार करताना त्यासाठी ब्यूटी फी (Beauty phi) च्या ग्रीक गोल्डनची मदत घेतली गेली. चेहऱ्याचं सौंदर्य पडताळण्यासाठी हे परिमाण गेल्या बऱ्याच दिवसांपासून वापरण्यात आलं आहे. या धर्तीवर एम्बरचा चेहरा 91.85 टक्के योग्य आला आहे. 


सौंदर्याचे निकष कोणते आणि त्यांचं मोजमाप नेमकं कसं केलं जातं ही बाब कायमच कुतूहलाची बाब ठरली आहे. आता मात्र मोजमापाचे निकषच समोर आल्यामुळं त्या धर्तीवर तयार करण्यात आलेली यादी सर्वांचं लक्ष वेधत आहे.