PHOTO :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी तयार असलेल्या नागा चैतन्यचे समांथासोबतच्या लग्नातील आठवणी VIRAL

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. यांच्या लग्नाच्या कार्यक्रमातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यात आता नागा चैतन्य आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समांथा यांच्या लग्नाचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

| Dec 02, 2024, 13:36 PM IST
1/7

नागा चैतन्य आणि समांथा 'ये माया चेसावे' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

2/7

समांथा 2015 मध्ये नागा चैतन्यच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टसोबत तिनं त्या दोघांचं नात अधिकृत केलं. समांथानं या पोस्टमध्ये नागा चैतन्यला तिची सगळ्यात जास्त आवडती व्यक्ती म्हटलं. त्यानंतर त्याच्या विषयी आणखी बऱ्याच चर्चा रंगू लागल्या. 

3/7

त्यानंतर समांथा आणि नागा चैतन्य हे दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावू लागले. तर नागार्जुन यांनी कथितपणे खुलासा केला होता की त्यांच्या मुलाला त्याच्या आयुष्यातली खास व्यक्ती भेटली आहे. 

4/7

काही काळानंतर नागा चैतन्य आणि समांथानं 2017 मध्ये जानेवारी महिन्यात हैदराबादमध्ये साखरपुडा केला. त्याच वर्षी ते दोघं लग्न बंधनात अडकले. 

5/7

आता नागा चैतन्य पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकत असून त्याच्या आणि समांथाच्या लग्नातील आणि कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक फोटो त्यांच्या लग्नातील आहे. यात लग्नानंतर नागा चैतन्यच्या घरी जात असताना समांथा रडताना दिसली. 

6/7

दरम्यान, त्यांनी हिंदू परंपरेसोबत ख्रिश्चन पद्धतीनं देखील लग्न केलं आणि उत्सुकता दाखवत फोटो देखील शेअर केला. 

7/7

समांथानं हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की मला भेटलेल्या सगळ्यात आदर्श असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस आणि मला माहित आहे की एक दिवस आपल्या मुलांचा तू आदर्श वडील होशील. मी तुला 100 जन्मांमध्ये निवडेन आणि मी फक्त तुलाच निवडेन.