सनरुफ, 6 Air बॅग, भन्नाट फिचर्स अन्..; अवघ्या 11 हजारात बूक करा सर्वात स्वस्त SUV! किंमत फक्त..

Cheapest Premium Compact SUV: तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत दमदार फिचर्स असणारी आधुनिक कार शोधत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो यात शंका नाही. आजपासूनच बुकींग सुरु झालेली ही 'स्कोडा'ची कार आहे तरी कशी आणि तिची किंमत किती आहे ते जाणून घ्या...

| Dec 02, 2024, 12:43 PM IST
1/12

skodakylaqbooking

या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. ही कार अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असून आजपासूनच कारचं बुकींग सुरु झालं आहे. हे बुकींगही अवघ्या 11 हजारांमध्ये करता येणार आहे. चला तर जाणून घेऊयात या कारचे फिचर्स आणि किंमत किती आहे ते...

2/12

skodakylaqbooking

भारतामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठीची मागणी वाढत असतानाच प्रत्येक कंपनी या सेगमेंटमध्ये आपली एखादी तरी कार असावी अशा उद्देशाने परवडणाऱ्या रेंजमध्ये कार उपलब्ध करुन देण्याच्या शर्यतीत उतरल्याचं दिसत आहे. प्रिमिअम कार्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या 'स्कोडा'नेही आपल्या नव्या कारसहीत या शर्यतीत उडी घेतल्याचं दिसत आहे.   

3/12

skodakylaqbooking

सध्या 'स्कोडा'चे भारतात 'अच्छे दिन' सुरु असून कंपनीच्या सर्वच गाड्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आजपासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून कंपनीने त्यांच्या नव्या आणि आपल्या सर्वात स्वस्त एसयूव्हीची बुकींग सुरु केली आहे. केवळ 11 हजार रुपयांमध्ये ही कार बूक करता येणार आहे.

4/12

skodakylaqbooking

कंपनीने लॉन्च केलेल्या या नव्या कारचं नाव स्कोडा कियाक असं आहे. या गाडीची वैशिष्ट्यं काय आहेत, फिचर्स काय आहेत. तिची किंमत किती आहे पाहूयात...

5/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकमध्ये 10 इंचाची टच स्क्रीन इन्फोर्टेनमेंट सिस्टीम, डिजीटल इन्स्यूमें क्लस्टर, सनरुफ, ऑटोमॅटीक हेडलॅम्प्स, एलईडी हेडलॅम्प्स, पॉवर्ड सिट्स, व्हेंटीलेटेड फ्रंट सिट्स आणि अजूनही बरेच फिचर्स आहेत.

6/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकमध्ये वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, किलेस एन्ट्री, पॉश बटन स्टार्ट/स्टॉप, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 6 एअर बॅग्स यासारखे फिचर्सही देण्यात आले आहेत.  

7/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकमध्ये 1.0 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 114 बीएचपी पॉवर आणि 178 एनएम टॉर्क निर्माण करतं. कारमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक गेअरबॉक्स देण्यात आला आहे.

8/12

skodakylaqbooking

आजपासून कंपनीने स्कोडा कियाकच्या बुकींगला सुरुवात केली आहे. या कारची डिलेव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. या कारचं अनावरण 17 जानेवारी 2025 रोजी भारत मोबिलिटी शोमध्ये केलं जाणार आहे. 

9/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकच्या बॅक ड्रॉपबद्दल बोलायचं झालं तर या कारमध्ये एडीएएस आणि 360 डिग्री कॅमेरा हे फिचर्स देण्यात आलेले नाहीत.  

10/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकचे चार व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. या व्हेरिएंटला क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीज अशी नावं देण्यात आली आहेत. लाल, पोपटी, काळा, निळा, पांढऱ्या रंगात ही कार उपलब्ध आहे.  

11/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकच्या बेस मॉडेलची किंमत 7 लाख 89 रुपये इतकी असणार आहे. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 14 लाख 50 हजार रुपयांपर्यंत (एक्स शोरुम प्राइज) जाईल आहे.  

12/12

skodakylaqbooking

स्कोडा कियाकच्या स्टीफ प्राइजिंगमुळे ही कार मारुती एक्सयूव्ही 3 एक्स ओ, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रिझ्झा, ह्युंडाई व्हेन्यू, किया सोनेट या सारख्या गाड्यांपेक्षाही सरस ठरल्याचं दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया आणि स्कोडाच्या वेबसाईटवरुन साभार)