`6-7 वर्षांपूर्वी माझ्यासाठी हे सोपं नव्हतं` यामी गौतमकडून बॉलिवूडबाबत मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. कोणत्याही गॉडफादरशिवाय तिने बी-टाऊनमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये काम करणं तिच्यासाठी कधीच सोपं नव्हतं. अभिनेत्रीला असे अनेक चित्रपट करायला लागले, जे तिला करायचे नव्हते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यामी गौतमने बॉलिवूडबद्दल खुलासा केला आहे. ती चित्रपटसृष्टीत नवीन असताना तिला कसं वागवलं गेलं आणि तिने तिचं स्थान कसं निर्माण झालं. यामीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तिच्या पहिल्या यशस्वी चित्रपटानंतरही तिला असे चित्रपट करावे लागले ज्यात ती खूश नव्हती.
अभिनेत्री म्हणाली, "मी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि मला आठवतं की मी आनंदी नव्हते. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेविरुद्ध काम करता आणि तेही कारण, तुम्हाला काम करत राहावं लागत म्हणून. कारण मला सांगण्यात आलं होतं की, 'तुम्ही लोकांच्या नजरेतून बाहेर जाल, तुम्हाला लोकं विसरतील', तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता. ६-७ वर्षांपूर्वीचा काळ माझ्यासाठी सोपा नव्हता.
यामी गौतमने असंही सांगितलं की, तिला फक्त काही निवडक अभिनेत्यांचे चित्रपट दिले गेले आणि तिला असेच चित्रपट मिळायचे, ज्यात जास्त गाणी होती. अभिनेत्री म्हणाली, मला फक्त काही नावांसह काम करण्यास सांगितलं होत.
यामी गौतमने 'विकी डोनर' मधून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर ती 'सनम रे', 'बाला', 'बदलापूर', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'दसवी', 'काबिल' 'भूत पोलिस' सारख्या चित्रपटात काम केलं आहे.