मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'A thursday loading.' ट्रेलर'मुळे चर्चेत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाईलमुळे चाहत्यांमध्येही वर्चस्व गाजवते. एवढंच नाही तर तिची एक झलक पाहण्यासाठी लोकं आतूर होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामीने शेअर केला बोल्ड फोटो
आता यामी पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती हिरव्या रंगाचा लेदर ब्लेझर आणि पँट परिधान केलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये यामी टॉपलेस दिसत आहे. यामीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. फोटो पाहिल्यानंतर सगळेजण यामीचं कौतुक करत आहेत.


लाईट मेकअप बरोबरच कंप्लिट केला लूक
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे. याचबरोबर अभिनेत्रीने लूक पूर्ण करण्यासाठी आपले केस मोकळे सोडले आहेत. यामीने तिचे अनेक फोटो एकत्र शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.  



यामीचे हे फोटो तिच्या आगामी ''A thursday loading' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे आहेत. पोस्ट शेअर करत यामीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'A thursday loading.' आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबतच सगळे यूजर्स सातत्याने कमेंट करून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत.