मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या हाँगकाँगमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे आणि याचे फोटो ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. गेल्या महिन्यातच यामीने तिचे लांब केस कापून शॉर्ट केले आणि तिच्या नवा कूल लूक सर्वांच्याच पसंतीस पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सर्बियामध्ये सिनेमाचे शूटिंग करत आहे. पण आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून यामीने बहिण सुरीली गौतमसोबत खूप एन्जॉय केले. लवकरच यामी गौतम 'उरी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.



या सिनेमासाठी यामीने फिटनेसपासून तिचा संपूर्ण लूक बदलून टाकलाय. यामीचा हा स्टायलिश बॉब लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.



यामीने २०१२ मध्ये बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. विक्की डोनर हा तिचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात ती आयुष्यमान खुरानासोबत दिसली होती. त्यानंतर ऋतिक रोशनसोबत काबिल सिनेमात ती झळकली.  



या सिनेमात पहिल्यांदाच शाहिद आणि यामीची जोडी पाहायला मिळणार आहे. सिनेमाचे डायलॉग्स आणि कथा गरिमा-सिद्धार्थने लिहिले आहेत. तर सिनेमाची कल्पना विपुल रावलची आहे.



सुत्रांनुसार हा सिनेमा ३१ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होईल.