मुंबई : दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली  KGF Chapter 2 ने कमाईचे सर्वंच विक्रम मोडले आहेत. तब्बल 7 आठवडे उलटून सुद्धा या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आता हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार आहे. त्यामुळे OTTचा संपुर्ण प्रेक्षकवर्ग या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यश स्टारर  KGF 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रत्येक नवीन सिनेमा त्याच्या सिनेमासमोर खाली पडलाय. तब्बल 7 आठवड्यानंतरही या सिनेमाला प्रेक्षक लाभलाय. देशातच नव्हे तर परदेशात या सिनेमाचा डंका आहे. 


OTT प्लॅटफॉर्मवर एंन्ट्री 


KGF 2 उद्या 3 जून रोजी प्लॅटफॉर्मवर एंन्ट्री मारणार आहे.  KGF 2 उद्या मध्यरात्री 12 नंतर Amazon Prime Video वर स्ट्रीम केला जाईल. रिलीजच्या ५० दिवसांनंतरही सिनेमागृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा KGF 2 आता घराघरांतही सहज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ओटीटीचा प्रेक्षक यशच्या एन्ट्रीसाठी आतूर झाला आहे.  


5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार
KGF 2 शुक्रवारी प्राइम व्हिडिओवर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा एकूण 5 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. दुसरीकडे, जर आपण या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललो तर, KGF 2 ने आतापर्यंत जगभरात 1235 कोटींची कमाई केली आहे आणि एक नवीन विक्रम गाठला आहे. KGF Chapter 2 हा यशच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.