मुंबई : सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहात आहेत. आता फक्त बॉलिवूडमध्येचं नाही, तर सर्वत्र अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. अशात अभिनेता आणि डान्सर राघव जुयालच्या घरी देखील लवकरचं  सनई-चौघडे वाजणार आहे. सध्या सर्वत्र राघवच्या भावाची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राघवचा भाव यशस्वी जुयालचा साखरपूडा झाला आहे. या आनंदाच्या क्षणाचे काही फोटो राघवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. 



व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राघव त्याच्या मोठ्या भावासोबत आणि वहिनीसोबत दिसत आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, राघव त्याचा भाऊ यशस्वी जुयाल आणि वहिनी आयपीएस रचिता यांच्यासोबत नाचताना आणि पार्टी करताना दिसत आहे.


दरम्यान, राघवच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, राघव जुयाल एका परदेशी मुलीला डेट करत असून दोघांचे काही फोटोही समोर आले आहेत. या मुलीचे नाव सारा अरहुसियस असून ती स्वीडनची आहे. 


 सारा आणि राघव यांची पहिली भेट एका ट्रेकींग दरम्यान झाली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. सारा कामानिमित्त अनेकदा भारतात येते आणि यादरम्यान ती राघवसोबत चांगला वेळ घालवते.