मुंबई : स्टार प्लसचा पॉप्युरल शो 'ये है मोहब्बते' फेम इशिता भल्लाची भूमिका करणारी दिव्यांता त्रिपाठी घराघरात पोहोचलीय. सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडियो खूप व्हायरल होतोय.


एलियन मला सोडत नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये ती एका एलियन्ससोबत डान्सची स्पर्धा करताना दिसतेय. 'डॅम टू कोसीता' गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केलाय.  यासोबत चिने कॅप्शनही जोडली आहे. लंडनला जायला मी तयार आहे. पण याच्यासोबत डान्स नाही करणार हा एलियन मला सोडणार नाही.



२३ लाख व्ह्यूज


जगभरात या एलियन्ससोबत डान्स करण्याचा ट्रेण्ड पसरतोय. अनेक सेलिब्रेटी याच्यासोबत डान्सची स्पर्धा करताना दिसतायत. दिव्यांकच्या या व्हिडियोला काही तासातच २३ लाखाहून अधिक व्ह्यूअर्स सापडले.