मुंबई : अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांना PETA इंडियाने 2021 मधील सर्वात सुंदर शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून घोषित केलं आहे. भूमी, जी तिच्या क्लायमेट वॉरियर मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षण आणि हवामान संकटासाठी देखील चॅम्पियन आहे. ती एक वर्षापूर्वी शाकाहारी झाली होती कारण तिला नॉमव्हेज खाल्यावर चांगल वाटत नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयसाठी, आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि  प्रोटीनच्या आवश्यकतेसाठी अभिनेता पूर्णपणे वनस्पतीआधारित आहारावर अवलंबून असतो. इंडियाचे सेलिब्रिटी आणि जनसंपर्क निदेशक, सचिन बंगेरा म्हणाले की, बॉलीवूडमधील सगळ्यात  फिट अभिनेत्यांपैकी एक असल्यानं हवामान क्रांतीचं नेतृत्व करण्यापर्यंत.  अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर प्रत्येकाला तंदुरुस्त आणि इको राहणं किती सोपं आहे हे दाखवत आहेत. 


यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनू सूद, मानुषी छिल्लर, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, शाहिद कपूर, रेखा, अमिताभ बच्चन आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री यांसारख्या दिग्गजांना या पुरस्कारामुळे सन्मानित करण्यात आलं आहे.