मुंबई : बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच आता वेब सीरिजची देखील मोठी क्रेझ पाहायला मिळते. भारतात इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढीमुळे ऑनलाइन कंटेंट खूप तयार होत आहे. 2018 मध्ये अनेक वेब सीरिज आल्या आणि प्रेक्षकांमध्ये त्या लोकप्रिय देखील झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 मध्ये आलेल्या या वेब सीरिजची खूप चर्चा झाली. अगदी त्याच्या दुसऱ्या पार्टची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 2018 च्या सरत्यावेळी आपण या वेब सीरिजचा आढावा घेणार आहोत. 



सेक्रेड गेम्स : 


2018 मधील सर्वात चर्चेत असलेली वेब सीरिज म्हणजे सेक्रेड गेम्स. सैफ अली खानसोबत नवाजुद्दी सिद्दीकी आणि राधिका आपटेने यात महत्वाची भूमिका साकारली आहे. 


नवाजुद्दीनने सेक्रेड गेम्समधील खलनायकाच्या भूमिकेतून संपूर्ण वेब जगतात धुमाकूळ घातला. या वेब सीरिजच्या दुसऱ्या पार्टची चाहते मनापासून वाट पाहत आहेत. 



ब्रीद 


थ्री इडिएट्स, RHTDM, साला खड्डूस सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आर माधवन देखील वेब सीरिजमध्ये आला. आर माधवनची 'ब्रीद' ही वेब सीरिज प्रचंड गाजली. 


यामध्ये आर माधवनने डॅनी मस्करेन्स या वडिलांची भूमिका साकारली होती. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हत्या करणाऱ्या वडिलांची ही कथा आहे. ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप पसंत पडली. 



मिर्झापूर 


ऍमेझॉन प्राइमवर वेब सीरिज 'मिर्झापूर' नुकतीच रीलिज झाली. पण अगदी रीलिजनंतर ही वेब सीरिज खूप चर्चेत आली. यामध्ये उत्तर प्रदेशची गोष्ट आहे. 


यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मैसी, दिव्याँशु शर्मा यांची मुख्य भूमिका आहे. तसेच यामधील महिला कलाकारांनी देखील उत्तम काम केलं आहे. 



इनसाइड एड्ज 


एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे बनवण्यात आलेली ही भारतातील पहिली ओरिजनल वेब सीरिज आहे. इनसाइड एड्जची कथा ही 20-20 क्रिकेट जगता भोवती फिरते. 


ऋचा यामध्ये टीम मालकीन झरीना मलिकची भूमिका साकारत आहेत. यामध्ये विवेक ऑबेरॉय, ऋचा चड्ढा, अंगद बेदी, तनुज वीरवानी, संजय सुरी मुख्य भूमिकेत आहेत. 



चाचा विधायक है हमारे 


विकास चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेली 'चाचा विधायक है हमारे' ही वेब सीरिज. ही कॉमेडी वेब सीरिज असून यामध्ये झाकिर खान रोनी नावाचं कॅरेक्टर साकारत आहे. तसेच याची कथा देखील त्याने स्वतः लिहीली आहे.