Yeh Hai Mohabbatein फेम अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत गुपचुप लग्न
टेलिव्हिजन विश्वात `ये है मोहब्बतें` फेम अभिनेता अभिषेक मलिकने गर्लफ्रेंड सुहानी चौधरीसोबत लग्न केले आहे.
मुंबई : टेलिव्हिजन विश्वात 'ये है मोहब्बतें' फेम अभिनेता अभिषेक मलिकने गर्लफ्रेंड सुहानी चौधरीसोबत लग्न केले आहे. दोघांनी 18 ऑक्टोबर रोजी लग्न केले. ये है मोहब्बतें मध्ये रोहनची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक मलिक आणि त्याची मैत्रीण सुहानी चौधरी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे.
अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी अडकले विवाहबंधनात
अभिषक मलिक आणि त्याची मैत्रीण सुहानी चौधरी यांनी 18 ऑक्टोबर रोजी एका खासगी समारंभात लग्न केले. अभिनेता अभिषेक मलिकने त्याच्या लग्नातील एक फोटो शेअर केले आणि लाल हार्ट इमोजीसह 'मिस्टर अँड मिसेस मलिक' लिहिले.
यावर्षी 26 जानेवारीला अभिषेक मलिक आणि त्याची मैत्रीण सुहानी चौधरी यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. त्याचवेळी, त्यांच्या लग्नाचा उत्सव सगाई आणि मेहंदी समारंभाने सुरू झाला. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले.