Ruhanika Dhawan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बतें' (Ye Hai Mohabbatein) मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुहानिका धवनचे (Ruhaanika Dhawan) लाखो चाहते आहेत. रुहानिकानं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रुहानिकानं वयाच्या 15 व्या वर्षी कोटींचं घर घेतलं आहे. रुहानिकानं ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. रुहानिकानं नक्की असं काय केलं की ती वयाच्या 15 व्या वर्षी कोटींची किंमत असलेलं घर घेऊ शकली आहे. (Ruhaanika Dhawan Home)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुहानिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुहानिका सगळ्यात आधी घराची चावी दाखवताना दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोत ती वडिलांसोबत बसल्याचे दिसत आहे. रुहानिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत रुहानिकानं तिच्या आयुष्यातील ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. या वेळी रुहानिकानं पांढऱ्या रंगाचं जॅकेट आणि क्रॉप टॉप परिधान केलं आहे. रिपोर्ट्सनुसार रुहानिकानं घेतलेल्या या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. 



यावेळी इतक्या कमी वयात स्वत: चे घर घेण्यासाठी संपूर्ण श्रेय तिच्या आईला दिले आहे. रुहानिकानं लिहिले की 'आज मी खूप खूश आहे. नवीन सुरुवात करते आहे. माझ्या अनेक स्वप्नांपैकी आज एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. माझ्या कमाईतून मी हे घर घेतल आहे. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्या आई-वडिलांनी नेहमीच मला दिलेल्या पाठिंब्यामुळे मला आज हे स्वप्न पूर्ण करता आलं. माझी आई माझ्यासाठी आयुष्यातली एक जादूगारच आहे. ती योग्य गुंतवणुक करते आणि पैसे डबल केले. देवाला आणि तिलाच माहित आहे की हे तिला कसं जमतं. ही तर फक्त सुरुवात आहे. मी आणखी मोठे स्वप्न पाहत आहे. जर मी हे करु शकते तर तुम्ही देखील नक्कीच करु शकता. स्वप्न बघत राहा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा एक दिवस ते नक्की पूर्ण होतील.' (Ruhaanika Dhawan Instagram Post)


हेही वाचा : 'या' आघाडीच्या Actress वर काय आली ही वेळ....एकेकाळी 400 जाहिरातीत कलेय काम


रुहानिकानं 'ये है मोहब्बतें' मालिकेत रुही ही बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. या मालिकेतून रुही ही घरा घरात पोहोचली. वयाच्या 15 व्या वर्षी रुही अप्रतिम काम करत आहे. इतकंच काय तर तिनं इतक्या लहान वयात मुंबईत घर खरेदी केले आहे. (Yeh Hai Mohabbatein Fame Ruhaanika Baught Home In Mumbai at The Age Of 15 )