प्रसिद्ध अभिनेत्रीची मोठी फसवणूक; इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळवणं पडलं महागात
डिजिटलच्या या युगात लोकं इतके प्रगत झाले आहेत की, बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात.
मुंबई : डिजिटलच्या या युगात लोकं इतके प्रगत झाले आहेत की, बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. मात्र, यामुळे लोकं ऑनलाइन फसवणुकीलाही बळी पडू लागले आहेत. आता टीव्ही अभिनेत्री नुपूर जोशीलाही फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. तिला फक्त इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवायची होती आणि त्यामुळे ती हॅकर्सच्या जाळ्यात अडकली.
या भीतीने नुपूर हैराण
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री नुपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितलं आहे की, तिने चुकून तिचे आयडी प्रुफ फसव्या ईमेलवर पाठवले आहेत. आता त्यांच्या या कागदपत्रांचा भविष्यात गैरवापर होऊ नये, अशी भीती तिला वाटत आहे. खरंतर नुपूरला इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवायची होती आणि म्हणूनच तिने तिचा आयडी प्रूफ ईमेलवर पाठवला.
नूपुरने इंस्टाग्राम व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केला
आता एका मुलाखतीत नूपुरने सांगितलं की, ती गेल्या 10 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. तिला तिचं इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करायचं होतं. अशा परिस्थितीत तिने आपल्या पेजवरून इन्स्टाग्राम टीमला रिक्वेस्ट पाठवली. अभिनेत्री पुढे म्हणाली की दुसऱ्या दिवशी सकाळी तिला इन्स्टाग्राम वरून एक ईमेल आला. ज्यामध्ये तिला व्हेरिफिकेशनसाठी ऑफिशिअल आयडी मागितली गेली होती आणि त्यानंतर तिचे खातं हॅक केलं गेलं.