Shivangi Joshi: सध्या अनेक अभिनेत्री आता आपल्या खिशातले पैसे काढून घर, बंगला, गाडी घेताना दिसत आहेत. त्यामुळे कुणा अभिनेत्रीनं अशी महागडी गाडी, घर किंवा बंगला घेतला तर सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा होते. नुकतीच एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 'ये रिश्ता क्या कहेलाता हैं' (Yeh Rishta Kya Kelata Hai 2) या अभिनेत्री संपुर्ण देशात प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या 15 हून अधिक वर्षे ही मालिका सुरू आहे. परंतु अद्यापही या मालिकेची लोकप्रियता संपलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या प्रमाणात या मालिकेला प्रेक्षकपसंती मिळाली होती. त्याचबरोबर आता या मालिकेचा दुसरा भाग 'ये रिश्ता क्या कहेलाता हैं 2' या मालिकेला खूप जास्त पसंती मिळते आहे. ही मालिका कौटुंबिक आणि प्रेमकथेवर आधारलेली (Love Story) आहे. 


हिना खान या अभिनेत्रीनं या मालिकेची लोकप्रियता वाढवली होती. ये रिश्ता क्या कहेलाता हैं या मालिकेचा उल्लेख जरी निघाला तरी हिना खानचे नावं पुढे येयाचे. आजही तिची लोकप्रियता कायम आहे. आता याच मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शिवांगी जोशी ही अभिनेत्री हिना खानची (Hina Khan) भुमिका करते आहे. या मालिकेलाही प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाला आहे. शिवांगी जोशी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्याचबरोबर तिचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. सध्या ती एक वेगळ्याच गोष्टीची चर्चेत आहे. 


सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होतो आहे ज्यात ती तिच्या पालकांसमवेत गाडीची चावी घेताना पोझ देते आहे. हा फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होत असून या फोटोचीच सगळीकडे चर्चा आहे. होय. पुण्यात जन्मलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीनं चक्क महागडी मर्सिडिज (Mercedes car) कार घेतली आहे. हा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता तेव्हा तिला तिच्या चाहत्यांकडून अनेक शुभेच्छाही देण्यात आल्या. 



या गाडीची किंमत साधारणपणे 57 लाख ते 63 लाख इतकी आहे. त्यातूनच मर्सिडिज कारचं हे कोणतं मॉडेल आहे ते मात्र अद्याप रिविल झालेले नाही. परंतु तिच्या या अचिव्हमेंटची सगळीकडेच चर्चा होते आहे. शिवांगीनं  'ये रिश्ता क्या कहेलाता हैं 2'  आणि बालिका वधू 2 (Balika Vadhu) मधूनही कामं केली आहेत.  'ये रिश्ता क्या कहेलाता हैं 2' या मालिकेतील कायरा ही भुमिका शिवांगीची प्रचंड गाजली. अभिनेता मोहसिन खानला ती डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.