मुंबई : बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूरने तिच्या अभिनयाने सिद्ध केलं आहे की, तिच्यात किती अभिनय क्षमता आहे. जान्हवीचे सोशल मीडियावरही बरेच चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्री मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी जान्हवी कपूर व्हाइट ड्रेसमध्ये दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने तिच्या ड्रेससोबत मॅचिंग व्हाईट बॅग देखील कॅरी केली होती. जी खूप चर्चेत आहे. जान्हवी कपूरची ही बॅग झोळीसारखी दिसत असली तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला या बॅगची किंमत कळेल तेव्हा तुम्हीही म्हणाल की या बॅगमध्ये नेमकं आहे तरी काय. अलीकडे, नुकतंच तिला पापाराझींनी कॉर्नफ्लेक्सच्या डिझाइनच्या बॅगसह स्पॉट केलं, जे पाहून दिसत आहे की, अभिनेत्रीला ही बॅग कॉर्नफ्लेक्सवर फ्रि मिळाली असेल. मात्र तसं नाही.



जान्हवीची बॅग अन्या ब्रँड्स कॉर्नफ्लेक्सची आहे. ज्यावर अन्या हिंदमार्क असं लेबल आहे. ज्याची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे. होय, ही अभिनेत्री एअरपोर्टवर 4 लाख रुपयांची बॅग घेऊन जाताना दिसली. जान्हवी कपूरकडे हँडबॅग्जचं चांगलं कलेक्शन आहे. तिच्याकडे 'लुई व्हिटन', 'गोयार्ड सेंट लुईस' 'मोशिनो स्पंजबॉब' चॅनेल' ब्रँड्ससह अनेक शीर्ष ब्रँड्सच्या बॅग आहेत ज्यांची किंमत रु. 6-7 लाख आहे.वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, जान्हवी लवकरच करण जौहरचा सिनेमा 'तख्त'मध्ये दिसणार आहे. या व्यतिरीक्त अभिनेत्रीचा टगुडलक जेरीट हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे.