तुमचे आवडते बॉलिवूड कलाकार भारताचे नाही तर या देशाचे नागरिक, पाहा संपूर्ण यादी
बॉलिवूडच्या या स्टार्सकडे आहे परदेशातील नागरिकत्व. पाहा कोण कोण आहेत या यादीत.
मुंबई : बॉलिवूड स्टार्सच्या नागरिकत्वावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले जातात. यावरुन अक्षय कुमार याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे. पण तरी देखील अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा बॉलिवूड स्टार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या स्टारकडे कोणत्या देशाचे नागरिकत्व आहे.
अक्षय कुमार
बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा जन्म भारतातच झाला, पण मोठा झाल्यावर त्याने कॅनडाचे नागरिकत्व घेतले. त्याच्याकडे भारतीय आणि कॅनडाचे दोन्ही देशांचे नागरिकत्व असल्याची माहिती आहे.
दीपिका पदुकोण
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जन्म भारतात झाला नव्हता. तिचा जन्म डेन्मार्कमध्ये झालाय आणि तिच्याकडे डॅनिश पासपोर्ट आहे. तिच्याकडे देखील दोन्ही देशाचे नागरिकत्व असल्याचेही सांगितले जात आहे.
आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्टकडे भारतीय पासपोर्ट आहे, असे अनेकांना वाटते, पण हे खरे नाही. आलियाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असून तिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.
कतरिना कैफ
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफचा जन्मही हाँगकाँगमध्ये झाला होता. तिचे वडील काश्मिरी होते तर आई ब्रिटिश नागरिक आहे. कतरिनाकडेही ब्रिटिश नागरिकत्व आहे.
जॅकलिन फर्नांडिस
मिस श्रीलंगा झालेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलीन सध्या वादात सापडली आहे. तिचा जन्म बहरिनमध्ये झालाय. जॅकलिनकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे.
तुम्हाला आवडेल
नर्गिस फाखरी
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने 2011 साली रॉकस्टार या चित्रपटातून पदार्पण केले. तिचा जन्मही अमेरिकेत झाला असून तिच्याकडे तिथले नागरिकत्व आहे.
सनी लिओन
अॅडल्ट फिल्म्स ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री सनी लिओनीकडे कॅनडाचे नागरिकत्वही आहे. तिचा जन्मही कॅनडामध्ये झाला होता.
एमी जॅक्सन
सुपरस्टार रजनीकांत यांच्या रोबोट 2.O चित्रपटात दिसलेली अभिनेत्री एमी जॅक्सनचा जन्म आयल ऑफ मॅनमध्ये झाला होता, तिच्याकडे यूकेचे नागरिकत्व आहे.