मुंबई : परदेशात अडचणीत सापडलेले भारतीय नेहमीच देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागतात. या अडचणीत असलेल्या भारतीयांसाठीही सुषमा स्वराज या नेहमीच तत्पर असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काही असेही असतात जे कशाचाही विचार न करता सुषमा स्वराज यांना मदतीची मागणी करतात. पुण्यातील अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा या जोडीचा ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमा पाहत होता. त्याने सुषमा स्वराज यांना ट्विट करून मदत मागितली आहे की, ‘मला वाचवा’.



विशाल सुर्यवंशी नावाच्या व्यक्तीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना टॅग करत ट्विट केलंय की, ‘मॅम, मी पुण्यात जब हॅरी मेट सेजल बघत आहे, कॄपया मला इथून वाचवा’. विशालचं हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. १००० पेक्षा जास्त वेळ हे ट्विट रिशेअर करण्यात आलंय. सुषमा स्वराज या ट्विटच्या माध्यमातून लोकांना नेहमीच मदत करतात. कदाचित त्यामुळेच हा सिनेमा पाहून हा प्रेक्षक इतका वैतागला असावा की, त्याने त्यांना थेट मदतीसाठी हाक मारली असावी. 


शाहरूख खान याचा जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा बॉक्स बॉफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाहीये. त्याच्या स्टारडमच्या तुलनेत फारच कमी कमाई या सिनेमाने केली. तसेच समीक्षकांनीही या सिनेमाला नापसंती दिलीये. तर प्रेक्षकही सोशल मीडियातून या सिनेमावर जोक्स करत आहेत. शाहरूखच्या या सिनेमाने शुक्रवारी आणि शनिवारी साधारण ३० कोटींची कमाई केली आहे.